गुढीपाडवा मेळाव्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंना (Raj Thackeray) मोठा धक्का मिळाला आहे. मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबूकला एक पोस्ट शेअर करत मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
कीर्तिकुमार शिंदेंची पोस्ट
“महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ‘भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…” अध्यक्ष राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं.”, असं मत कीर्तिकुमार शिंदेंनी पोस्टमधून व्यक्त केलंय.
(हेही वाचा – Arvind Kejriwal: गेल्या २४ तासांत केजरीवालांना दुसरा मोठा दणका; आता ‘ही’ याचिका फेटाळली)
पोस्टमध्ये भाजपा,मोदी-शहा यांचा उल्लेख ‘भामोशा’
राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘भामोशा’ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे (MNS) आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही.
कोण आहेत कीर्तिकुमार शिंदे ?
कीर्तिकुमार शिंदे हे तसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. याआधी २०१९ ला त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या “लाव रे तो व्हिडिओ “या सिरीज मध्ये सोबत राहून राज ठाकरे यांच्या मनसे साठी ही सिरीज हिट करून दाखवण्यासाठी फार मेहनत घेतली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community