“पालिकेमध्ये वीरप्पन गॅंग सक्रिय”, मनसे करणार पर्दाफाश

वीरप्पन गँगचा कारनामा, मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं सूचक ट्वीट

पालिकेमध्ये वीरप्पन गॅंग सक्रिय असून ही गॅंग मुंबईकरांची लुट करत असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी विरप्पण गँगचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

असा आहे व्हिडिओ…

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ करून त्यांच्या सोशल मीडियावर टाकला आहे. यामध्ये त्यांनी पण चेकने पैसे घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या नगरसेवकांचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगितले. आजवर तुम्ही भ्रष्टाचार करणारे नगरसेवक पाहिले असतील पण आता भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणाऱ्या नगरसेवकांचा मनसे करणार पर्दाफाश मनसे करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – ‘सुनील पाटील गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलंय?’)

 

विरप्पन गॅंगवरून मनसे-शिवसेना वाद

वीरप्पनने लोकांना लुटले नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटले आहे. मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग कार्यरत आहे. या वीरप्पन गँगने महापालिकेची भरमसाठ लूट चालवली आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काउण्टर करावाच लागेल. रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन, अशा आशयाचे टि्वट संदीप देशपांडे यांनी केले. यावर, खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहीत करून घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त गुगल सर्च करून बघावे. गुगलच्या पहिल्याच पानावरच या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत; पण प्रत्येक जिल्हातील यांची स्टोरी सेम टू सेम आहे,’ असे उत्तर देत वरुण देसाई यांनी मनसेवर खंडणीखोरीचा आरोप केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here