मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 मे रोजी बीकेसी येथे घेतलेल्या सभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी राज ठाकरे यांचा नाव न घेता मुन्नाभाई असा उल्लेख केला. त्यावरुन आता मनसे आक्रमक झाली असून, त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुन्नाभाई सिनेमाची डिव्हीडी भेट देण्याचे ठरवले आहे. त्यांनी ते सिनेमे नीट पाहिले नसल्यामुळे आपण त्यांना डीव्हिडी भेट देणार असल्याचे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
सिनेमा पहा आणि…
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही सिनेमांची डिव्हीडी उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. हे दोन्ही सिनेमे त्यांनी पूर्ण बघितले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी बीकेसीवरील सभेत स्वतःच जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांना त्यातील गोष्टी माहीत नाहीत. लगे रहो मुन्नाभाई मध्ये संजय दत्तने गांधींचे विचार वाचले, त्यामुळे त्यांनी ते आत्मसात केले. तसेच राज ठाकरे यांनी लहानपणापासून बाळासाहेबांसोबत राहून त्यांचे विचार आत्मसात केले आहेत. त्यामुळे त्या सिनेमाची गोष्ट त्यांना माहीत नसल्यामुळे आपण त्यांना या सिनेमांची डिव्हीडी भेट देणार आहोत. त्यांनी तो सिनेमा नक्की पहावा, गेट वेल सून असा टोलाही खोपकर यांनी लगावला आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यात मला रस नाही- अजित पवार)
उद्धव ठाकरेंची टीका
संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे, आपल्याकडे. स्वतःला बाळासाहेब समजायला लागतात, शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झाला आहे, असे मुन्नाभाई फिरत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती.
(हेही वाचाः राज ठाकरेंचा ‘वसंता’ अजूनही नाराज? ‘मनसे’च्या पत्रिकेतून नावंच गायब, काय म्हणाले मोरे?)
Join Our WhatsApp Community