देशात सध्या प्रत्येकाच्या तोंडात एकाच चित्रपटाचे नाव आहे, तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी यावरून वाद देखील निर्माण झाले आहेत. दरम्यान, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटींहून अधिकच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यांवर घेतलं असलं तरी यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ काहींनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला. त्यामुळे, या चित्रपटाबद्दल अनेकांची उत्सुकता वाढली. आता, मनसेनं हा चित्रपट फुकट दाखवण्यास सुरुवात केली आहे.
मनसेकडून ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट मोफत
नुकतेच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. माहिम विधानसभा आयोजित हा चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला आहे. 24 मार्च रोजी सायंकाळी 7.15 वाजता एल.जे. रोडवरील सिटी लाईट सिनेमागृहात हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तसेच, तिकीट मिळविण्यासाठी संपर्क करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, असेही त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – आता ‘द काश्मीर फाईल्स’ प्रदर्शित होणार ‘या’ चार भाषांमध्येही!)
#kashmirifiles pic.twitter.com/hYcZZpkweB
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 22, 2022
चित्रपट प्रादेशिक भाषांमध्येही होणार डब
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचे घर सोडावे लागले होते. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत इतरही काही नामवंत कलाकारांच्या भूमिका असून हा चित्रपट आता प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे. या भाषांमध्ये तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेंचा समावेश असणार आहे.
Join Our WhatsApp Community