राज ठाकरेंच्या आदेशानंतर मशिदीसमोर हनुमान चालिसा सुरू!

170

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंच्या सभेला मनसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तसेच मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय घ्या, असा इशारा सरकारला दिला. महाराष्ट्र सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत निर्णय न घेतल्यास मशिदी समोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावू, अशा इशारा ठाकरे यांनी दिला होता.

मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर चालिसा सुरू

मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही देखील भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले होते. या आदेशानंतर हनुमान चालिसेला सुरुवात झाली आहे. घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा सुरू करण्यात आली आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. हनुमान चालिसा संदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही नियम लावले नाहीत. फक्त कालच्या भाषणातील राज यांचं आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे.

(हेही वाचा – ‘या’ प्रकरणी प्रविण दरेकर यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस)

राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता

दरम्यान, रमजानचा महिना सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण चांगलेच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केला आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे उतरवण्यात आले

मुंबईच्या घाटकोपरमधील मनसे कार्यायलयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले आहेत. पोलिसांनी येऊन मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी काढले आहेत. पोलिसांनी अगोदर समज देऊन त्यानंतर भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती आहे. मनसेचे चांदिवली विभागातील महेंद्र भानुशाली यांच्या कार्यालयासमोरील झाडावर लावण्यात आलेले भोंगे उतरवण्यात आले आहेत. मनसेचे महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना चिरागनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. घाटकोपर मधील चांदिवली विधानसभा क्षेत्रात महेंद्र भानुशाली यांच्या कार्यालयाबाहेर भोंगे लावण्यात आले होते. सकाळी मनसे कार्यकर्ते देखील जमल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.