गोदावरी नदीच्या वाढत्या प्रदूषणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, बुधवारी नाशिकमध्ये (Nashik) पक्षाने आंदोलन छेडले. मनसेचे कार्यकर्ते पंचवटीतील रामकुंड परिसरात गोदावरी नदीपात्रात उतरले आणि पानवेली घेऊन नदी स्वच्छतेची मागणी केली. या आंदोलनाद्वारे नदीचे पावित्र्य जपले जावे आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असा संदेश मनसेने दिला. (Nashik)
हेही वाचा-Deenanath Mangeshkar Hospital प्रकरणात धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर
मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी या आंदोलनाची घोषणा करताना सांगितले की, गोदावरीसह राज्यातील नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात, यासाठी पक्ष आता हा मुद्दा हाती घेणार आहे. रामकुंडात मनसैनिकांनी नदीत उड्या मारून आणि पानवेलींद्वारे प्रदूषणाकडे लक्ष वेधले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका करत, नदी स्वच्छतेसाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. (Nashik)
हेही वाचा- BMC News : मुंबईकरांनो आपली वाहने रस्त्यावर धुळखात पडली का? तर आता महापालिका करणार थेट कारवाई !
नाशिकमध्ये गोदावरी नदी ही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो; मात्र, वाढते प्रदूषण नदीच्या पावित्र्याला धोका निर्माण करत आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी यापूर्वी नद्यांच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचे मानले जाते. कार्यकर्त्यांनी “गोदावरी वाचवा” अशा घोषणा देत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. (Nashik)
हेही वाचा- Shivsena UBT गटाचे प्रवक्ते जाहीर: जाणून घ्या नक्की कोण कोण आहेत अधिकृत प्रवक्ते ?
स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. नदीतील दूषित पाणी आणि अतिक्रमणामुळे शेती आणि जीवसृष्टीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मनसेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरच उपाययोजना झाल्या नाहीत, तर आंदोलन तीव्र केले जाईल. या घटनेने नाशिकमध्ये गोदावरी स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Nashik)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community