विधानसभा निकालानंतर मनसेचा पहिला राज्यस्तरीय मेळावा; Raj Thackeray यांच्या मोठ्या निर्णयांची शक्यता

115

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पहिला राज्यस्तरीय मेळावा उद्या गुरुवारी वरळीत होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच मोठा पक्षस्तरीय मेळावा असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Raj Thackeray)

या मेळाव्यात राज ठाकरे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील काही प्रस्थापित नेत्यांना धक्का देण्याची शक्यता असून, आगामी राजकीय दिशा ठरवण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. (Raj Thackeray)

(हेही वाचा- नवी मुंबईप्रमाणे ठाण्यातही यश मिळवण्याचा मंत्री Ganesh Naik यांचा निर्धार)

निवडणुकीतील कामगिरीचा आढावा, संघटनात्मक फेरबदल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मेळाव्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेच्या भविष्यातील रणनीतीबाबत राज ठाकरे मोठे संकेत देऊ शकतात. (Raj Thackeray)

या मेळाव्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, राज ठाकरे कोणते निर्णय घेतात, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. (Raj Thackeray)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.