कर्नाटकातील हिजाबवरून जो वाद पेटला आहे. तो आता हळूहळू देशभरात पसरू लागला आहे. महाराष्ट्रात हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोधात निदर्शने, मोर्चे काढण्यात आले. याचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत. पश्चिम बंगालमध्येही याचे पसादड उमटले आहेत. या प्रकरणावरून पश्चिम बंगाल पेटले आहे .
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील बाहुली येथे राहणारी एक विद्यार्थिनी हिजाब आणि बुरखा घालून शाळेत पोहोचली होती. यादरम्यान शाळेतील शिक्षकाने मुलीला सांगितले की ती हिजाब आणि बुरखा घालून शाळेत येऊ शकत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या दंगलखोरांनी शाळेची तोडफोड करत दगडफेक केली. विद्यार्थिनीला हिजाब आणि बुरखा घालण्यास मनाई केल्यावर तिने घरी जाऊन हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी स्थानिक लोकांसह शाळेत पोहोचून जोरदार तोडफोड केली. शाळेतील तोडफोड आणि गोंधळाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.
(हेही वाचा #Factcheck बुरखाधारी महिलांवर गटाराचे पाणी ओतणारी ‘ती’ मुले कोणती? व्हायरल व्हिडिओमागील सत्य)
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, पण लोक ते मानायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. सध्या या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.
जयपूरमध्येही मुस्लिम महिलांनी आंदोलन केले
जयपूरमध्येही मुस्लिम महिलांनी हिजाबच्या वादावरून निदर्शने केली होती. शनिवारी अल्बर्ट हॉलमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन निषेध केला. मुस्लीम महिला म्हणाल्या की, संविधानात सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलेले असताना मुस्लिम महिलांशी वाद का?
Join Our WhatsApp Community