मणिपूरमध्ये (Manipur) पुन्हा हिंसाचार सुरु झाला असून मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांच्या निवासस्थानी अचानक जमाव पोहोचला आणि त्यांनी घरावर हल्ला चढवला. या हिंसाचारात अनेक आमदारांची घरे, मालमत्ता जाळण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा : Navi Mumbai Drugs Case : ५.६२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, २ नायजेरियन नागरिकांना अटक)
मणिपूर सरकारने दि. १६ नोव्हेंबर रोजी राजधानी इंफालमध्ये (Imphal) कर्फ्यू लागू केला आहे. जिरीबाम जिल्ह्यातील तीन लोकांच्या हत्येच्या न्यायासाठी इंफालमध्ये निदर्शने सुरु झाल्यानंतर सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली आहे. आतापर्यंत इंफालमध्ये (Imphal) दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरांवर आंदोलकांनी हल्ला केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन आणि ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण मंत्री एल. सुसिंद्रो सिंग यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. तसेच मणिपूरमध्ये तणाव वाढल्याने इंफालमध्ये (Imphal) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (N. Biren Singh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community