नितीन गडकरी धमकी प्रकरण: आरोपी जयेश पुजारीकडून मोबाईल्स आणि सीमकार्ड जप्त

130

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्या प्रकरणी नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहात केलेल्या अचानक तपासणीत जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याच्याकडून यापूर्वीच्या आणि आताच्या गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि सीम कार्ड मिळाल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.

यामध्ये एक मोबाईल आणि सीम कार्ड २२ मार्चच्या धमकी प्रकरणात वापरले आहे. तर एक सीम कार्ड १४ जानेवारी रोजी वापरलेल्या धमकी प्रकरणातील आहे. दरम्यान आता आरोपीला ट्रान्झिट वॉरंटवर नागपुरात आणण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गडकरींना धमकी देण्यासाठी एका तरुणीच्या मोबाईलचा उपयोग करण्यात आला होता. तिची विचारपूस केली असता कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली नाही असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. तुरुंगात कडेकोट सुरक्षा असताना गुन्हेगाराला फोन व सीमकार्ड मिळते हे गंभीर आहे. आम्ही स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली आहे.

गेल्या २२ मार्च रोजी बेळगाव तुरुंगातून १० कोटींची मागणी करणारा फोन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात आला होता. त्याच्या शोधासाठी एक पथक बेळगावला रवाना झाले होते. पथकाने पोहोचल्या नंतर तेथील तुरुंग प्रशासनाच्या मदतीने सर्च ऑपरेशन केले. त्यावेळी मोबाईल व सीमकार्ड सापडले. तपासाच्या दृष्टीने हा मोठा पुरावा असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींवरील विरोधकांच्या घोषणाबाजीवरून सुधीर मुनगंटीवार संतापले; म्हणाले, कुणाच्या औकातीत…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.