पंढरपूर शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभारणार

120

पंढरपूर शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाची क्षमता वाढवण्याच्या सूचना तांत्रिक विभागाला दिल्या आहेत. ही यंत्रणा आधुनिक करण्यात येईल, असे विधान राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी लक्षवेधी सूचनांना उत्तर देतांना केले.

( हेही वाचा : मालाडमध्ये ‘सीआरझेड’ क्षेत्रात कोणाच्या आशीर्वादाने स्टुडिओ उभारले? – भातखळकरांचा ‘मविआ’ला सवाल)

१५ दिवसांतून पाण्याच्या शुद्धतेची पडताळणी करण्यात यावी

भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेमध्ये लक्षवेधी सूचना केली होती. त्यावर शासनाच्या वतीने शंभुराज देसाई यांनी उत्तर दिले.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उजनीच्या पाण्याचे पाणीव्यवस्थापन करावे, तसेच प्रत्येकी १५ दिवसांतून पाण्याच्या शुद्धतेची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावर शंभुराज देसाई म्हणाले, ‘‘पंढरपूरच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही.’’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.