लोकसभा निवडणुकीत 293 जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या एनडीए (Modi 3.0) सरकारचा रविवारी (9 जून ) शपथविधी पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील सहा जणांनी मंत्रिपदाची शपत घेतली. यामध्ये नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहळ यांचा समावेश आहे. (Modi 3.0)
दरम्यान, काही मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. एनडीएच्या 14 मित्रपक्षाकडे 53 खासदारांची फौज आहे. पण फक्त 9 पक्षांना 11 मंत्रिपदे मिळाली आहेत. पाच मित्रपक्षांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. (Modi 3.0)
कुणाला स्थान नाही मिळालं ?
मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या पक्षामध्ये जनसेना पार्टीचं नाव आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे दोन खासदार आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम), असम गण परिषद आणि ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन (आजसू) यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. (Modi 3.0)
कोणत्या राज्याला किती मंत्रिपदे ?
उत्तरप्रदेश 10, बिहार 8, महाराष्ट्र 6, गुजरात 5, कर्नाटक 5, मध्य प्रदेश 5, राजस्थान 4, आंध्र प्रदेश 3 ओदिशा 3, हरियाणा 3, झारखंड 2, पश्चिम बंगाल 2, तेलंगणा 2, केरळ 2, पंजाब 1, गोवा 1, छत्तीसगढ 1, जम्मू काश्मिर 1, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 1, हिमाचल प्रदेश 1, उत्तराखंड 1 (Modi 3.0)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community