लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मास्टर प्लान तयार केला आहे. मोदी यांनी महाराष्ट्रातील एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे 38 प्रकल्प मार्गी लावण्याचं ठरवले आहे. या प्रकल्पांना 20 वर्षे विलंब झाला आहे. 20 वर्षांपासून अडकलेल्आ या प्रकल्पांचा खर्च 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. यातील दोन प्रकल्पांचा खर्च तर तब्बल 500 टक्क्यांनी वाढला आहे.
पंतप्रधानांचे लक्ष्य
महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते, शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे 20 वर्षांपासून प्रलंबित असलेले 38 मोठे प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीच या प्रकल्पांना पूर्ण करण्याचे उद्धिष्ट मोदी यांनी ठेवले आहे. हे लक्ष्य केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून, देशातील सर्व राज्यांसाठी आहे.
( हेही वाचा मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांसाठी सोडल्या ‘या’ नव्या एक्सप्रेस! )
महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प
- रेल्वे: 14, मूळ किंमत- 18 हजार 567 कोटी, अंदाजित खर्च -32 हजार 949 कोटी
- कोळसा: 5, मूळ किंमत 1 हजार 801 कोटी, अंदाजित खर्च 2 हजार 113 कोटी
- पेट्रोलियम: 5, मूळ किंमत 11 हजार 287 कोटी, अंदाजित खर्च 13 हजार 529 कोटी
- शहरी विकास: (मेट्रो) 1, मूळ किंमत- 23 हजार 136 कोटी, अंदाजित खर्च- 33 हजार 406 कोटी
- महामार्ग: 13, मूळ किंमत 8 हजार 966 कोटी, 9 हजार 806 कोटी
Join Our WhatsApp Community