किरीट सोमय्यांना केंद्राची ‘पॉवर’!

किरीट सोमय्यांभोवती तब्बल ४० सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेचे कवच असेल.

129

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून सरकारचा पाया ढिसूळ करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना अधूनमधून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने आता किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना ‘पॉवर’ देण्यात आली आहे.

सोमय्या यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा!  

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल ४० सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेचे कवच असेल. सोमय्यांना झेड दर्जाची सुरक्षा असेल. महत्त्वाचे म्हणजे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांचे भ्रष्टचाराची प्रकरणे बाहेर काढल्यावर सोमय्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचे सुरक्षेचे कवच असेल. तीन मिनिटांत कुठल्याही प्रसांगास सामोरे जाण्यासाठी सीआयएसएफ जवान सज्ज असतात. सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक बनवून सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

अशी असते झेड सुरक्षा!

झेड दर्जाच्या सुरक्षा कवचामध्ये २२ सैनिक असतात. यामध्ये चार किंवा पाच एनएसजी कमांडोंचा समावेश असतो. शिवाय एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा देखील समावेश असतो. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारमधील ११ नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावरुन त्यांच्या नावाची यादीच जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.