Modi Government : तीन मार्चला मंत्रिमंडळाची शेवटची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २०१४ पासून आतापर्यंत केलेली कामे आणि २०४७ पर्यंत भारताला विकसित बनविण्याची योजना या दोन्ही गोष्टींची माहिती प्रत्येक घरापर्यंत अगदी हायटेक पध्दतीने पोहचविली जाणार आहे.

178
Gayatri Parivar: गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञात पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित
Gayatri Parivar: गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञात पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ मार्चला सध्याच्या मंत्रिपरिषदेची शेवटची बैठक घेणार आहेत. त्यात काही मंत्र्यांना आव्हानात्मक जागांवर विजय निश्चित करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती घरोघरी पोहचविण्याची जबाबदारी नेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. (Modi Government)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील सरकारने २०१४ पासून आतापर्यंत केलेली कामे आणि २०४७ पर्यंत भारताला विकसित बनविण्याची योजना या दोन्ही गोष्टींची माहिती प्रत्येक घरापर्यंत अगदी हायटेक पध्दतीने पोहचविली जाणार आहे. (Modi Government)

कल्याणकारी योजनांची माहिती देणार

भाजपने केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती अगदी हायटेक पध्दतीने मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती आहे. यासाठी २५ हजारापेक्षा जास्त आयटी तंत्रज्ञांची सेवा घेतली जाणार आहे. याशिवाय, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे २२५ डाटा सेंटर देशभरात बनविण्यात आले आहेत. (Modi Government)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा सामना?)

आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) अभियानाची रणनीती आखण्यात गुंतलेल्या नेत्यांनुसार, पक्ष केवळ आपल्या ताकदीवर विश्वास व्यक्त करत नाही तर कमकुवत जागावर फोकस करत आहे. विशेषत: अशा जागांवर २०१९ मध्ये विजयाचे अंतर खूप कमी होते. केंद्रातील सत्तेत १० वर्षे राहणे आणि खासदारांविरुद्ध तक्रारीही एक पैलू आहे. लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Elections 2024) मध्ये ३७० हून जास्त जागा जिंकण्याच्या तयारीत असलेल्या भाजपसमोर अशा ५० जागा वाचवण्याचे आव्हान आहे, ज्या गेल्या निवडणुकीत २०१९ मध्ये पक्षाने जिंकल्या होत्या. विशेषत: अशा जागा जिथे जिंकण्याचे अंतर ५० हजारांपेक्षा कमी होते. पक्षात यासाठी रणनीती आखली जात आहे. (Modi Government)

लोकांसोबत संपर्क वाढवा

पीएम मोदींनी काही ठिकाणी भाजप खासदारांना हे सांगितलेले आहे की, फक्त मोदींच्या नावावर जिंकण्यासाठी अवलंबून राहू नका आणि लोकांमध्ये राहा. असे खासदारांना सांगण्यात आले आहे.​ भाजपला एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या मित्रपक्षांचीही चिंता आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने शेवटच्या क्षणी काही जागावर उमेदवार जाहीर करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (Modi Government)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.