राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार आणि जागावाटपायावरून अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आता मात्र एका जाहिरातीमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.
राज्यातील सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षात कल्याण डोंबिवली लोकसभेच्या जागेवरून तणाव निर्माण झाला होता. दरम्यान १३ जून रोजी राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा टॅगलाइने जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचे सांगितले आहे. आता या जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
या जाहिरातीनुसार महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेची एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याचे एका सर्व्हे मधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा –‘ठाणे’ कुणाचे? : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपाचा दावा)
इतकेच नाही तर महाराष्ट्रातील ४९.३ टक्के जनतेने शिंदे – फडणवीस या जोडीला पसंती दर्शवल्याचे देखील या जाहीरातीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या जाहिरातीवरून आता अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
जाहिरातीत अजून काय म्हटलंय?
संपूर्ण पानभर देण्यात आलेल्या या जाहिरातीत दावा केला आहे की, या सर्व्हेमध्ये भाजपला ३०.२ टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप शिवसेनेच्या युतीसोबत असल्याचा दावा देखील या जाहिरातीतून करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community