२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने यापूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त (133rd birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar) भारतीय जनता पक्षाने आपले संकल्पपत्र, दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत घोषित केले. यामध्ये भारतीय रेल्वेसाठी (Indian railway) आणि प्रवाशांसाठीही मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. (Modi Guarantee)
आधुनिक रेल्वे स्टेशन, रेल्वेचे सुपर ॲप
या संकल्पपत्रात, भाजपाचे सरकार सत्तेत आले तर आगामी १० वर्षात ३१ हजार किमीचा रेल्वेमार्ग बांधला जाईल. दरवर्षी ५ हजार किमीचे नवीन ट्रॅक बांधले जातील. तसेच २०३० पर्यंत रेल्वेत प्रवाशांना नेण्याच्या क्षमतेत वाढ केली जाणार आहे. ज्यामुळे वेटिंग तिकिटांचा प्रश्न मिटवता येऊ शकेल. ट्रेनसेवांची संख्या, डब्यांची संख्या आणि रेल्वेचा वेग वाढवण्यात येईल, वंदे भारत ट्रेनचा (Vande Bharat Train) विस्तार, तीन नवीन बुलेट ट्रेन यांसारख्या मोठ्या घोषणा भाजपाने आपल्या संकल्प पत्रातून केल्या आहेत. तसेच वंदे भारत चेअरकार, स्लीपर आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन, अशा तीन मॉडेलवर देशातील वंदे भारत ट्रेन चालवल्या जाणार आहेत. देशातील तीन भागांत बुलेट ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. याशिवाय आधुनिक रेल्वे स्टेशन, रेल्वेचे सुपर ॲप. अशी ग्वाही भाजपाने प्रवाशांना जाहीरनाम्यातून दिली आहे. (Modi Guarantee)
(हेही वाचा – BMC : मुंबईत ३१ मे अखेर पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या – संगीता हसनाळे)
भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय?
भाजपने आपल्या संकल्प पत्रात (BJP resolution letter) तरुण, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम राबविण्याचं सांगितलं आहे. मच्छीमारांसाठी विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि धान्य सुपरफूड म्हणून विकसित करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. एकलव्य शाळा सुरू करण्याचं आश्वासनही दिलं गेलं आहे. याशिवाय, एससी/एसटी आणि ओबीसींच्या कल्याणासाठी काम करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. (Modi Guarantee)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यातील 23 टक्के तृतीयपंथी मतदार ठाणे जिल्ह्यात)
5G चा विस्तार आणि 6G चा विकास
तसेच, यामध्ये रामायण उत्सव साजरा करणे, अयोध्येचा पुढील विकास, भ्रष्टाचाराविरोधात कारवाई आदी आश्वासने देण्यात आली आहेत. सत्तेत परत आल्यास देशात न्यायालयीन संहिता लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’वर काम सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. रेल्वेबाबतही जाहीरनाम्यात आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांमधील प्रतीक्षा यादीची समस्या संपुष्टात येईल, असे सांगण्यात आले. याशिवाय ईशान्य भागात बुलेट ट्रेनचे काम सुरू असल्याचीही चर्चा आहे. 5G चा विस्तार आणि 6G चा विकास, ऊर्जेत स्वावलंबी होण्याचे आश्वासनही दिले आहे. (Modi Guarantee)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community