आतापर्यंत सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार (Modi’s Public Rally in Satara ) कधीही निवडून आला नाही, मात्र या लोकसभा २०२४ मध्ये पहिल्यांदा भाजपाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जाहीर सभेला मिळालेल्या जनतेच्या प्रचंड प्रतिसदामुळे. आणि या अफाट जाहीर सभेचे आयोजन करण्याची जबाबदारी होती ती भाजपाचे (BJP) सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil kadam) यांच्याकडे. (Modi’s Public Rally in Satara )
दीड लाखांच्या सभेचे चोख नियोजन
गेली अनेक वर्षे धैर्यशील कदम (Dhairyashil kadam) विविध माध्यमातून जिल्ह्यातील लोकांच्या संपर्कात असून त्यांच्या जनसंपर्काचा उपयोग भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान होत आहे. मोदी यांची २८ एप्रिलला साताऱ्यात जाहीर सभा झाली. या सभेच्या व्यासपीठापासून, हेलीपॅड उभारणी, सुरक्षा व्यवस्था, सभेसाठी येणाऱ्या जनसमुदायासाठी पाणी, रुग्णवाहिका तसेच अन्य आवश्यक सेवा-सुविधांची जबाबदारी कदम यांनी चोख केली होती. सभेला जवळपास दीड लाखाचा जनसमुदाय मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी जमला होता. त्याचे पूर्ण नियोजन कदम यांनी यशस्वीपणे पार पाडले त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Modi’s Public Rally in Satara )
(हेही वाचा- Raja Chhatrasal : छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन ’राजा छत्रसाल’ यांनी निर्माण केले होते स्वराज्य?)
मोठी संधी मिळेल
कदम हे गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असून कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातून दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवली आहे. आता सहा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी त्यांच्यावर असून जिल्ह्यात आणखी जोमाने काम करण्याचा मनोदय कदम यांनी व्यक्त केला. महायुतीतील अन्य घटक पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी संधी मिळेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. (Modi’s Public Rally in Satara )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community