Mohan Yadav : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा नव्या चेहऱ्याकडे 

Madhya Pradesh CM : विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे आता राज्याची सत्ता मोहन यादव यांच्या हातात असेल.

275
Mohan Yadav : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा नव्या चेहऱ्याकडे 
Mohan Yadav : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा नव्या चेहऱ्याकडे 

मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा कोण घेईल, याबाबतचा भाजपने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावावर एकमत झाले आहे. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय मानले जातात.

विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे आता राज्याची सत्ता मोहन यादव यांच्या हातात असेल.

(हेही वाचा – Article 370 : ३७० कलम हटविल्यानंतर जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था आकडेवारी कितीने वाढली )

मोहन यादव यांच्यासह मध्यप्रदेशमध्ये २ उपमुख्यमंत्री असतील. जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन – मोहन यादव

“मी केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्व यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली गेली आहे. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याने मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्रीपदासाठी स्वत:च्या नावाची घोषणा झाल्यानंतर मोहन यादव (Mohan Yadav) यांनी दिली आहे.

मोहन यादव यांची कारकीर्द

मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे (Ujjain South) विद्यमान आमदार आहेत. त्यांना संघाचे निकटवर्तीय मानले जाते. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. 2013 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2018 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा उज्जैन दक्षिणची जागा जिंकली. मार्च 2020 मध्ये शिवराज सरकारची पुनर्रचना झाल्यानंतर जुलैमध्ये त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. 2 जुलै 2020 रोजी शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते राज्याच्या राजकारणात आले.

(हेही वाचा – Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती; हा देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दणका)

आतापर्यंत ४ वेळा विधानसभेत

मोहन यादव यांचा जन्म 25 मार्च 1965 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. ते बऱ्याच काळापासून भाजपसोबत आहेत. मोहन यादव यांनी उज्जैन दक्षिण (Ujjain South) मतदारसंघातून काँग्रेसच्या चेतन प्रेम नारायण यांचा 12 हजार 941 मतांनी पराभव केला. मोहन यादव 1990 मध्ये नवव्या विधानसभेचे आणि 1993 मध्ये दहाव्या विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. ते संसदीय मंडळाचे सदस्यही आहेत. 2003 मध्ये ते 12 व्या विधानसभेवर निवडून गेले. त्या वेळी ते राज्यमंत्री होते. 2008 मध्ये 13 व्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना सरकारमध्ये परिवहन, तुरुंग, नियोजन, आर्थिक आणि सांख्यिकी आणि गृह विभागाची जबाबदारीही देण्यात आली.

भाजपचा अनपेक्षित धक्का

यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया, प्रदेश भाजप अध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती हे भाजपचे प्रमुख प्रचारक होते. मोहन यादव यांचे नावही या शर्यतीत समाविष्ट नव्हते. इतकेच नाही तर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी झालेल्या फोटो सेशनमध्ये मोहन यादवही (Mohan Yadav) मागच्या रांगेत बसले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.