मध्य प्रदेशच्या मोहन यादव (Mohan Yadav) सरकारने तब्बल ५४ गावांची नावे बदलण्याची घोषणा केली आहे. देवास जिल्ह्यातील पिपलरावण गावात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान भाजपाचे (BJP) जिल्हाध्यक्ष रायसिंग सैंधव (Raysingh sendhav) यांना ज्या गावांची नावे बदलायची त्यांची यादी काहींनी दिली असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी मंचावरच हा प्रस्ताव स्वीकारला आणि त्या गावांचे नाव बदलण्याची घोषणा केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. (Mohan Yadav)
( हेही वाचा : Accident News : भरधाव कार ट्रॉलीवर आदळून भीषण अपघात; चार मित्रांचा दुर्दैवी अंत, तिघे जखमी)
‘या’ गावांची नावे बदलणार
मुरादपूर – मुरलीपूर
हैदरपूरचे – हिरापूर
शमशाबादचे – श्यामपूर
इस्माईल खेडी – ईश्वरपूर
अलीपूर – रामपूर
नबीपूर – नयापुरा
मिर्झापूर – मीरापूर (Mirapur)
अशा प्रकारे ५४ गावांची नावे बदलण्यात येणार आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी शाजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात ११ गावांची नावे बदलली होती. उज्जैन (Ujjain) दौऱ्यात त्यांनी तीन गावांची नावे बदलली होती. (Mohan Yadav)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community