भाजपा नेते मोहित कंबोज यांनी, राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावरून कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. कंबोज आणि विद्या चव्हाण यांच्यात ट्विटवर वॉर सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. या वादाचे पडसाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यापर्यंत गेले आहे.
जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली…
जय सियाराम !
FIR Registered Against Vidya ताई Chavan Ji Under Section IPC 505 (2) , 37 (1) , 135 , 500 !हर हर महादेव !@Vidyaspeaks pic.twitter.com/072OV6bw2H
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 29, 2022
प्रांतिक वाद निर्माण केल्याचा आरोप
विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि 505 (2), 37 (1), 135 आणि 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहित कंबोज यांनी फिर्याद दिली आहे. मोहित कंबोज असतील किंवा तो किरीट सोमय्या त्यांना गुजरातमध्ये पाठवून द्या ना, त्यांना महाराष्ट्रात आता काही काम नाही. त्यांनी गुजरातमध्ये जावे, इथे चौकशी करु नये, गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या डायमंडचा व्यापार आहे, लोकांचे धंदे आहेत, उद्योग आहेत. त्यांची चौकशी करावी. महाराष्ट्रात आम्ही लोक आहोत, आम्ही चौकशी करू, आमचे काय करायचे ते करू. गृहमंत्री प्रामाणिक लोकांच्या चौकशा लावतो आणि गुन्हेगार लोकांना मंत्रीपदे देतो, असे विधान विद्या चव्हाण यांनी केले होते. त्याविरुद्ध मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. प्रांतिक आणि भाषिक वाद निर्माण केल्याची ही तक्रार आहे. कंबोज यांनी गुन्ह्याचा एफआरआरही शेअर केला आहे. तसेच बंजरंग बली की जय, असे ट्विटही केले आहे.
(हेही वाचा हिंदू मुलीला जाळणाऱ्या ‘शाहरुख’चे नाव दाखवले ‘अभिषेक’; सोशल मीडियावर टीकेची झोड
Join Our WhatsApp Community