उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल म्हणत मोहित कंबोज यांची राऊतांवर जहरी टीका

119

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज सकाळी माध्यमांसोबत संवाद साधून सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. त्याच पार्श्वभूमीवरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. ट्वीटवर उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल म्हणतं मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.

मोहित कंबोज काय म्हणाले?

मोहित कंबोज ट्वीटमध्ये म्हणाले की, उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल संजय राऊत सकाळी सकाळी नशा करणं बंद कर. नवाब मलिक तर गर्दुल्ला होता, तू देखील सकाळी सकाळी फुकायला चालू केलंस असं वाटतं आहे. जरा जीभेवर आवर घालणं गरजेचं आहे, अशा प्रकारे एकेरी भाषेत बोलून राऊतांवर कंबोज यांनी जहरी टीका केली आहे.

यापूर्वी मोहित कंबोज यांनी पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत १०० हून अधिक दिवसांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर ट्वीट केलं होत. त्यावेळी त्यांनी ट्वीट करून म्हटलं होत की, ‘उद्यापासून पुन्हा मैदानात उतरावं लागेल असं वाटतंय.’

बुधवारी सकाळी काय म्हणाले होते राऊत? 

भाजपवर निशाणा साधत राऊत म्हणाले होत की, ‘महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलं आहे, हे सगळ्यांना माहित आहे. आम्ही शुद्धीत आहोत. या लोकांची भांग उतरली की हे सरकार जाईल. या राज्याची जनता किती शुद्धीत आहे ते कसब्याच्या निकालानं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भांग पिऊन जे सत्तेवर बसले आहेत त्यांना समजेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे? त्यांची भांग कसब्यात उतरली आहे.’

(हेही वाचा – भूमिका स्पष्ट करण्यासाठी आठ दिवसांची वेळ द्या; हक्कभंग प्रकरणी संजय राऊत यांचे पत्र)

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.