महामराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे ताबडतोब खाली उतरावा, अन्यथा दुप्पट पटीने भोंगे लावून त्यावरून हनुमान चालीसा लावण्यात येईल, असे म्हटले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे भाजपने जाहीरपणे समर्थन दिले. भाजप नेते मोहित कंबोज यांनी तर याकरता १० हजार भोंग्यांची ऑर्डर दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेसाठी मोठ्या संख्येने भोंगे पुरवली जाणार आहेत.
मंदिराबाहेर लावण्यासाठी भोंगे मोफत
ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कडव्या हिंदुत्वाच्या घोड्यावर स्वार झालेले राज ठाकरे यांनी बळ देण्यासाठी भाजपमधून मोहित कंबोज पुढे आले. त्यांनी मंदिरावर लावण्यासाठी 10 हजार भोंगे आणि एप्लिफायरची ऑर्डर दिल्याचे सांगितले आहे. राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर मंगळवारी, १२ एप्रिल रोजी ठाण्यात सभा होणार आहे. त्या सभेत ते अजून काय बोलणार, याची उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय काढताच त्यांच्या मदतीला भाजप आल्याची चर्चा सुरु झाली दिसत आहे. याला कारण मोहित कंबोज यांची दहा हजार भोंगे आणि एप्लिफायरची ऑर्डर कारणीभूत बनली आहे. मंदिराबाहेर लावण्यासाठी हे भोंगे सगळ्यांना मोफत दिले जातील. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे आवाजाची मर्यादा ठेवून हे एप्लिफायर बनवा, अशी ऑर्डर त्यांनी दिली आहे.
(हेही वाचा राष्ट्रवादीचा छोटुसा भोंगा… मनसेचे ट्विट चर्चेत)
Join Our WhatsApp Community