राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरिोधात मोठ कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप मोहित कंबोज (Mohit Kamboj ) यांनी केला आहे. त्यांनी या कटाविषयी, तो कोणी रचला, त्यामागील कारण काय याचा खुलासा अद्याप केलेला नाही. ते लवकरच यासंबंधीची सविस्तर माहिती देणार आहे. पण त्यांनी काही जणांच्या पदाचा उल्लेख केला. काही पक्षांचा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे नाव न घेता उल्लेख केल्याने एकच खळबळ माजली आहे. कंबोज (Mohit Kamboj ) लवकरच याविषयीचा गौप्यस्फोट करणार आहेत.
(हेही वाचा –Pune Crime: गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपनीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त)
मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाचा आणि कटाचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. (Mohit Kamboj )
(हेही वाचा –Action By ED: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणाऱ्यांवर ईडीची कारवाई, २६८ बिटकॉइन्स जप्त)
Very Soon I will Expose a Conspiracy planned against Devendra ji By #SPNCP & #UBTSena.Paid hit job by one criminal Ex journalist .Master minds one #SPNCP lady politician & #IPS & financed by 1 #MLA. Will expose how they are creating fake content.Stay tuned & ready for big expose.
— Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar ) (@mohitbharatiya_) May 4, 2024
या कटात कोण-कोण सहभागी आहेत, याची माहिती कंबोज यांनी दिली आहे. पण यामध्ये कोणाची नावे घेतलेली नाही. त्यांनी काहींच्या पदाचा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराचा या कटात समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. तर या षडयंत्रात एका माजी पत्रकाराचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरच याविषयीचा खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण हा खुलासा कधी करणार आणि या कटात कोण कोण सहभागी आहे, त्यांची नावे कंबोज यांनी दिलेले नाही. (Mohit Kamboj )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community