मलिकांच्या पोटात दुखतंय, कंबोज यांनी केले मिश्किल ट्विट…

165
राष्ट्र्वावादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने मलिकांना ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. अटकेपासून तीन दिवस उलटले नाही तोच मलिकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यावर भाजपचे माजी युवा नेते मोहित कंबोज यांनी मिश्किल ट्विट केले आहे.

मलिकांवर उपचार

या प्रकरणी मलिक यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्यांनी पोटात दुखत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. नवाब मलिक मंत्रीपदावर असल्यामुळे त्यांच्यावरील उपचारांसाठी सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर देखरेख करत असून जे जे रुग्णालयाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.

काय आहे ट्विट?

दरम्यान यावर मोहित कंबोज यांनी मिश्किल ट्विट केले, त्यामध्ये एक पुस्तक दाखवण्यात आले आहे, त्यावर छगन भुजबळ यांचा फोटो आहे. त्यावर ‘छातीत कळ आणण्याचे सत्तावीस उपाय – छगन भुजबळ’ असे लिहिण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.