आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?

164

चंद्रपूर काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

पीडित महिलेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि पती साईनाथ बुटके हे चिमूर येथील राहणारे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके हे साईनाथ यांचे मोठे बंधू आहेत. ११ तारखेला भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया सायंकाळी साडे सातच्या सुमारास काही कार्यकर्त्यांना घेऊन बुटके यांच्या घराबाहेर आले. मग बुटके यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जबरदस्तीने घराच्या आतमध्ये शिरले. साईनाथ यांना मारहाण करतच त्यांना घराबाहेर ओढून आणले. या मारहाणीला विरोध करत असताना त्यांचा विनयभंग केला गेला आणि मारहाणही केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

एवढेच नाहीतर आमदार भांगडिया यांनी पीडित महिला, साईनाथ आणि यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना देखील मारहाण केली. याच दरम्यान जेव्हा गजानन बुटके घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी भांगडियांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही मारहाण करण्यात आली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर भांगडिया यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांविरुद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – अजित पवारांच्या डोळा मारण्यावर अनिल बोंडे म्हणाले, ‘जर बाळासाहेब ठाकरे असते तर….’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.