विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या सभांनी आणि प्रचाराने जोर धरला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार नेत्यांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यांनी मोठा थयथयाट केला होता. त्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खोचक टीका केली आहे.
(हेही वाचा – Jharkhand Assembly Election: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; अनेक दिग्गज नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला)
“काल आणि आज उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) बॅग तपासली. खरं तर निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकाऱ्यांना कुठं काय तपासावं हेसुद्धा कळत नाही. ज्या व्यक्तीच्या हातातून कधी पैसा सुटला नाही, त्या व्यक्तीच्या बॅगेत काय असणार आहे? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी, याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही”, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली. ते भांडूप येथील सभेत बोलत होते.
एवढा तमाशा करायची गरज नाही
राज ठाकरे पुढे बोलताना ते म्हणाले, की “उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आता त्याचा मोठा बाऊ केला जातो आहे. मुळात बॅग तपासण्यात गैर काय? अनेकदा आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या. निवडणूक अधिकारी त्यांचं काम करत असतात. त्याचा एवढा तमाशा करायची गरज नाही. त्यातही ते संबंधित अधिकाऱ्यांचा व्हिडीओ काढतात. त्याला नियुक्तपत्र दाखवायला सांगतात, मुळात कोणताही अधिकारी नियुक्ती पत्र घेऊन फिरतो का? कुणाला काय विचारावं, हेही उद्धव ठाकरेंना माहिती नाही. त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद हवं आहे. या लोकांनी सगळा तमाशा करून ठेवला आहे”, अशी टीकाही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी केली कर्मचाऱ्यांची चौकशी
औसा येथे जाहीर सभेला जातांना उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेण्यात आली. उद्धव ठाकरेंनीही सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांचे नाव, त्यांचं नियुक्त पत्रक, एवढेच नव्हे, तर त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत, याचीही विचारणा केली. तत्पूर्वी काल वणी येथे उमेदवाराच्या प्रचाराला जात असतानाही त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी थयथयाट केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community