राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कथीत खंडणी प्रकरणात आता माजी पोलीस अधिकराी सचिन वाझे याला माफिचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. याकरता मुंबई सत्र न्यायालयात स्वतःवाझेने अर्ज दाखल केला होता. दरम्यान या केलेल्या अर्जाला सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यामुळेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्यची शक्यता आहे.
(हेही वाचा – सायबर गुन्ह्यांमध्ये चार पटीने वाढ; सक्षम यंत्रणेअभावी उकल करण्यात अपयश)
मंगळवारी सचिन वाझेला सीबीआयच्या विशेष सत्र न्यायालयापुढे व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते. त्यामध्ये सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. 7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष न्यायालयापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
Maharashtra | Special CBI court has approved the application of dismissed police officer Sachin Waze to turn 'approver' against other accused including former home minister Anil Deshmukh in an alleged corruption case. The court has ordered Waze to appear before it on June 7
— ANI (@ANI) June 1, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, कथित खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांबद्दल आपल्याकडे असलेली माहिती देण्यास तयार असल्याचे वाझेने सांगितले आहे. यासाठी आपल्याला माफीचा साक्षीदार करावे असे त्याने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. त्याचा हा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने काही अटी-शर्तींसह मंजुरी दिली.
Join Our WhatsApp Community