आर्थिक गैरव्यवहारात अनिल देशमुखच ‘मास्टर माईंड’!

116

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच आर्थिक गैरव्यवहारामागे मास्टर माईंड असल्याचे, ईडीने उच्च न्यायालयात गुरुवारी सांगितले आहे. मनी लाॅंड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले अनिल देशमुख यांना भ्रष्ट्राचारातून मिळवलेल्या वारेमाप संपत्तीचा स्त्रोत काय याचे स्पष्टीकरण देता आलेले नाही. असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने देशमुखांच्या जामीन अर्जाला विरोध करत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

…तर ते पुराव्यांशी छेडछाड करतील

2 नोव्हेंबर रोजी देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आले आहे. भ्रष्ट्राचार प्रकरणी सध्या ते सीबीआय कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वीच विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर ईडीने उत्तर दाखल केले आहे. ईडीच्यावतीनं सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्यावतीनं ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी उत्तरादाखल हे 56 पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. देशमुख हेच या मनी लॉन्ड्रिंगच्या कटामागेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी अधिकृतपणे आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकार्‍यांच्या कामगिरीवर अवाजवीपणे त्यांनी प्रभाव टाकल्याचेही यात नमूद केलेले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. देशमुख हे एक राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांची सुटका झाल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच देशमुख हे तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना जामीन देऊ नये, असेही ईडीने म्हटले आहे.

( हेही वाचा: सोमय्यांचा घणाघात! … म्हणाले जेवढे घोटाळेबाज सापडत आहेत त्या सगळ्यांचा बॉस ‘वांद्र्यात’ )

म्हणून त्यांना जामीन द्यावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. पीएमएलए न्यायालयाने 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रकृता अस्वस्थाचे कारण तसेच वाढते वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडून करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेला आहे, या आजारांमुळे त्यांना जामिन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.