विधान परिषदेत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना अनुदान मंजूर करण्यासंबंधीत तारांकीत प्रश्नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर उत्तर देत असताना विरोधकांना समाधान झाले नाही, त्यांनी यावर गोंधळ घातल्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खाली बसून बोलल्यावर विरोधकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला, मंत्री पाटील हे दादागिरी करत बोलले असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली, यावर काही वेळ सभागृह स्थगित झाले, त्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना कडक शब्दांत झापले आणि संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्याला ताकीद द्यावी असे सांगत गुलाबराव पाटील तुमचे वागणे चुकीचे आहे, तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला मी ताकीद देते, असे म्हटले.
( हेही वाचा : भंडारा बलात्कार प्रकरणी विधान परिषदेत गोंधळ)
मंत्री पाटलांनी माफी मागण्याची मागणी
या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी, या विषयाची फाईल अर्थ खात्याकडे पाठवण्यात आली आहे, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेत ही फाइल आधीच मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली असताना आता ती फाईल पुन्हा अर्थाखात्याकडे का पाठवता, ते सुपर सीएम आहेत का, असे सांगत गोंधळ घातला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी खाली बसून काही वक्तव्य केले, ती भाषा दादागिरीची होती, असे सांगत विरोधकांनी माफी मागण्याची मागणी केली.
उपसभापती भडकल्या
त्यानंतर उपसभापती गोऱ्हे यांनी मंत्री पाटील यांना झापले, तुम्ही मंत्री आहात, तुमचे वागणे बरोबर नाही, माझ्याकडे बघून हातवारे करत कसे बोलता, सभागृहाची शिस्त आहे, तुमच्या खात्याचा संबंध नसताना तुम्ही बोलताच कसे, छातीवर हात मारून काय बोलता, तुम्हाला ताकीद देते आणि संसदीय कार्य मंत्र्यांनीही मंत्री पाटील यांना समज द्यावी, असे म्हटले.
Join Our WhatsApp Community