उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर आज म्हणजेच सोमवार १७ पासून विधीमंडळाच्या पावसाळी (Legislature Monsoon Session 2023) अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे दुखावलेले विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार की सत्ताधारी वरचढ ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या विषयांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
हे अधिवेशन (Legislature Monsoon Session 2023) १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. सकाळी ११ वाजता विधानसभा तर दुपारी १२ वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
अधिवेशनाच्या (Legislature Monsoon Session 2023) पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न मोठे असताना सत्ताधारी फोडाफोडीच्या राजकारणात गुंतले असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. अशातच आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात कमी झालेला पाऊस, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारातील दुर्देवी घटना अशा विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधकांचे संख्याबळ कमी असल्याने विरोधक आपला आवाज किती बुलंद करतात, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
विधिमंडळाच्या #पावसाळी_अधिवेशन_२०२३ च्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, आमदार उपस्थित होते.#MonsoonSession #Maharashtra pic.twitter.com/KPe5EhrzjK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 16, 2023
(हेही वाचा – Pakistan : पाकिस्तानात हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला)
तर, दुसरीकडे सभागृहात संख्येने जास्त असलेले सत्ताधारी आक्रमक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या (Legislature Monsoon Session 2023) पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने विरोधकांचे अवसान गळाले आहे. विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. चांगल्याला चांगले म्हणायची जबाबदारी विरोधी पक्षाची असते असेही त्यांनी म्हटले. आम्ही फक्त आमच्या कुटूंबाची जबाबदारी घेतली नाही तर राज्यातील जनतेची जबाबदारी घेतली असून आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याचे काम आम्ही करत आहोत असेही त्यांनी म्हटले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community