जून महिन्याच्या २७ तारखेपासून पावसाळी अधिवेशन चालू झाले आहे. दरम्यान, पाचव्या दिवशी म्हणजचे २ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी महायूती सरकार पाडण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. पण सरकार पडलं नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना (opposition party) लगावला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ते विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायूती सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले. (Monsoon Session 2024)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महायूती सरकारला दोन वर्ष (Mahayuti government completes 2 years) पूर्ण झाले आहेत. ज्या दिवशी हे सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच हे सरकार पडेल असं म्हणणं सुरु झालं. पण असं करुन करुन या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. सरकार पडावं म्हणून त्यावेळी अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार काही पडलं नाही पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले.” असा टोला विरोधकांना लावला. (Monsoon Session 2024)
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या भाषणावर आले नियमांचे गंडांतर; जाणून घ्या काय आहेत संसदेत बोलण्याचे नियम)
दरम्यान, विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा केली असून, त्यासाठी सरकार दरबारी काम सुरू आहे. तसेच शिवरायांची वाघनखे देखील लवकरच भारत देशात आणली जाणार आहेत. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत केली. (Monsoon Session 2024)
(हेही वाचा – Ind W bt SA W : भारतीय महिलांचा दक्षिण आफ्रिकेवर एकमेव कसोटीत १० गडी राखून विजय)
ते पुढे म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांचा आणि घेतलेल्या निर्णयांचा आम्हाला अभिमान आहे. विचार, विकास आणि विश्वास ही आमच्या यशाची त्रिसुत्री आहे. आमच्या काळात ९ अधिवेशन आणि ७५ कॅबिनेट झाल्या. त्यात सुमारे ५५० हून अधिक निर्णय आम्ही घेतले. या काळात बरेच वेताळ आडवे आले परंतू, आम्ही विकासाचा विक्रम करत गेलो. घरात बसून नाही तर लोकांच्या दारात शासन नेल्यामुळे हे निर्णय आम्ही घेऊ शकलो,” असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. (Monsoon Session 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community