विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून पासून सुरू होत असून सर्व संबंधित विभागांनी उत्तमप्रकारे पूर्वतयारी करावी. अतिवृष्टीसंदर्भातील इशारा तातडीने सन्माननीय सदस्य आणि पत्रकार यांना उपलब्ध व्हावा त्याचप्रमाणे साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी, कर्मचाऱ्यांना रेनकोट बरोबरच पावसाळी बूट देखील उपलब्ध करुन देण्यात यावे. अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. (Monsoon Session 2024)
(हेही वाचा – Bhau Torsekar यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस मागे, भाजपच्या Shweta Shalini यांच्या ट्विटची चर्चा)
सोमवारी विधानभवन येथे Dr Neelam Gorhe यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशन संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलीस, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, हवामान विभाग, एमटीएनएल, मध्य आणि कोकण रेल्वे, मेट्रो प्रकल्प अशा सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Monsoon Session 2024)
(हेही वाचा – Cemetery : प्रदूषणमुक्तीसाठी महानगरपालिकेचे पाऊल; मुंबईतील ९ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपुरक लाकडी दहन यंत्रणा)
या बैठकीत प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिवेशनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विद्यमान १४ व्या विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्याचप्रमाणे १२ जुलै रोजी विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित ११ विधानपरिषद सदस्यांची निवड प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने विधानमंडळात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आणि सुरक्षा विभागाने सुयोग्य नियोजन करावे. शनिवार, २९ जून या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज होणार असल्याने सन्माननीय सदस्यांचे जाण्याचे आणि सोमवारी येण्याचे रेल्वे आरक्षण प्राधान्याने उपलब्ध व्हावे. तसेच सुरक्षा व्यवस्थेतील महिला पोलीस, अन्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी, महिला पत्रकार इत्यादींसाठी विशेष कक्ष, स्वच्छता गृहांची सकाळी आणि दुपारी साफसफाई व्हावी अशा सूचनाही विधानपरिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी दिल्या. (Monsoon Session 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community