Monsoon Session : आधी चंद्रकांत पाटील भेटले मग ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात पोहोचले; चर्चांना उधाण

450
Monsoon Session : आधी चंद्रकांत पाटील भेटले मग ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात पोहोचले; चर्चांना उधाण
Monsoon Session : आधी चंद्रकांत पाटील भेटले मग ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात पोहोचले; चर्चांना उधाण
  • मुंबई प्रतिनिधी 
राज्य विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून उबाठा गटाच्या सर्व आमदारांनी पूर्ण वेळ विधानभवन परिसरात हजर राहण्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आदेश दिले होते. त्यातच आज दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे विधान भवनाच्या परिसरात आगमन झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या कार्यालयात असताना मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अनिल परब (Anil Parab) यांना पेढा भरवला तसेच उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली. (Monsoon Session)
बारा वाजताच्या दरम्यान विधान परिषदेचे कामकाज सुरू होणार होते त्यावेळी तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर जाण्याकरिता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच वेळी लिफ्ट जवळ एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये सामान्य चर्चा देखील झाल्या. विधान परिषदेच्या कामकाजात सहभाग घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकाच लिफ्ट मध्ये गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेणे तसेच लिफ्ट मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विधानमंडळात लिफ्ट जवळ भेट घेणे यामुळे विधान भवन परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Monsoon Session)
दिल मिले ना मिले पर हाथ मिलाते चले असेच काहीसे वातावरण लिफ्ट जवळ पहावयास मिळाले. लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर जोरदार हल्ले झाल्यानंतर आता विधानसभेसाठी तयारी सुरू झालेली असताना अशा प्रकारच्या भेटीमुळे राजकीय वातावरण काहीसे निवळलेले पाहावयास मिळाले. (Monsoon Session)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.