Monsoon Session : विधानसभेत पेपरफुटीचा मुद्दा थोरातांकडून उपस्थित; उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

154
Monsoon Session : विधानसभेत पेपरफुटीचा मुद्दा थोरातांकडून उपस्थित; उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
Monsoon Session : विधानसभेत पेपरफुटीचा मुद्दा थोरातांकडून उपस्थित; उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) सोमवार (१ जुलै) चौथा दिवस आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले आहे. पेपरफुटीप्रकरणी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अर्थसंकल्पावर केलेल्या टिकेवरून सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केली. विधानसभेत पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. (Monsoon Session)

(हेही वाचा –Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, कारण काय?)

विधानसभेत (Monsoon Session) पेन्शनच्या मुद्द्यावरदेखील चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. मात्र याबाबत तीन सदस्यीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. वेगवेगळ्या संघटनांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर राज्य सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. निवडणुकीच्या काळात काहींनी जाहीरनाम्यात आम्ही पेन्शन सुरू करणार असल्याचे जाहीर केले. निवृत्त झाल्यावर पेन्शन मिळाली पाहिजे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

यावेळी भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, काही संघटनांकडून शिक्षांना भडकवण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. खोटे बोला पण रेटून बोला अशी काही मंडळी आहेत. असेही ते म्हणाले. (Monsoon Session)

(हेही वाचा –परळ, मालाडला बनतो अवघ्या तीन हजारांत Passport; सीबीआयच्या कारवाईने खळबळ)

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला आहे. पेपरफुटीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. यामुळे तरुणांचे मोठे नुकसान होत असल्याचे थोरात म्हणाले. तसेच याप्रकरणी चौकशी करून कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. (Monsoon Session)

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ”पेपरफुटीप्रकरणी राजकारण करायचे नाही. मात्र मागच्या सरकारच्या काळात किती पेपर फुटले याबाबत माझ्याकडे माहिती आहे. याबाबत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ५७ हजार नवीन नियुक्त्या सरकारकडून झाल्या. ७७ हजार लोकांना सरकारने नोकरी दिली. यासाठी सरकारकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत.” (Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.