पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून

129

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या ६ दिवसांच्या कामकाजानंतर गुरुवारी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपुरात १९ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे दोन्ही सभागृहात जाहीर करण्यात आले.

( हेही वाचा : १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ)

कोरोना निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले . या ९ दिवसांच्या कालावधीत ६ दिवसांचे कामकाज झाले. या अधिवेशनात एकूण १० विधेयके मंजूर करण्यात आली. शिवाय विविध विभागांच्या २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजूरी देण्यात आली.

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई, एनडीआरएफपेक्षा दुप्पट मदत,पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

पायाभूत सुविधांना बळकटी

या अधिवेशनात पायाभूत सुविधांना बळकटी देणारे निर्णय घेण्यात आले. येत्या तीन वर्षांत मुंबई पालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार, गिरणी कामगारांना ५० हजार सदनिका देणार, कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली, बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर, अशा घोषणा करण्यात आल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.