Monsoon Session : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने

127
Monsoon Session : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने

राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी “भ्रष्टाचारी झाले चौकीदार असा महायुतीचा कारभार”, “भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चीट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. (Monsoon Session)

(हेही वाचा – हिंदू मंदिरांच्या परिसरात मुसलमानांची दुकाने नकोत; VHP ची मागणी)

भाजपा हटवा, भ्रष्टाचार मिटवा

महायुती सरकारची ऑफर पक्षप्रवेश करा, क्लीन चिट मिळवा; शूर आम्ही मिंधे – दादा – भाजपाचे सरदार गरिबांना चिरडून होऊ पसार, मदतीला आमच्या मिंध्यांचे सरकार”; सर्वसामान्यांच्या जीवाला नाही मोल, श्रीमंतांचा पैशांच्या जीवावर सुरू खेळ, भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार; अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला. (Monsoon Session)

भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चीट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भाजपाच्या वॉशिंग मशिनचा धिक्कार असो, भ्रष्टाचारी सरकार हाय हाय, टक्केवारी सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, हिट अँड रनच्या आरोपींना मदत करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो घोषणा देत आघाडीने विधानभवन परिसर दणाणून सोडला. (Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.