राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात पावसाळीअधिवेशनाच्या (Monsoon Session) आठव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई’, ‘सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. (Monsoon Session)
(हेही वाचा- शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक; पिक विमा योजनेविषयी काय म्हणतात Dhananjay Munde)
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. आंदोलनात अनिल देशमुख (Anil Deshmukh), भाई जगताप (Bhai Jagtap), अजय चौधरी (Ajay Chaudhary), रवींद्र धांगेकर (Ravindra Dhangekar), प्रज्ञा सातव (Pradnya Satav) उपस्थित होते. (Monsoon Session)
भाजी महागली कडधान्य महागले महागाईने मध्यमवर्गीय कोलमडले, सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी, सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई, महागाईने जनता त्रस्त महायुती सरकार वसुलीत व्यस्त अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत वाढत्या महागाई विरोधात महाविकास आघाडीने घोषणा देत महायुती सरकारला घेले. (Monsoon Session)
सरकार आहे वसुलीत मस्त महागाईने जनता त्रस्त, खोके सरकार हाय हाय , महागाईवर नियंत्रण न ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बियाणांचा दर वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महागाई हाय हाय, केंद्रसरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला. (Monsoon Session)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community