कोरोना संकटाच्या काळात देखील राज्याचे पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत असून, हे अधिवेशन फक्त दोन दिवसच असणार आहे. मात्र अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच राज्यातील ३५ आमदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता फक्त कोरोनाची चाचणी करून निगेटीव्ह असल्याचे अहवाल असणाऱ्यांनाच अधिवेशनासाठी प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे अधिवेशनासाठी सर्व आमदारांसोबत विधानभवन परिसरातील कर्मचारी, सुरक्षारक्षक अशा सगळ्यांची मिळून एकूण १७०० जणांची चाचणी करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत ३५ आमदार आणि ३७ कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
चहापानाचा कार्यक्रमही रद्द
दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम असतो. मात्र राज्यातील कोरोना संकटामुळे यंदा चहापानाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नुकतेच झालेल्या निधनामुळे असलेला दुखवटा हे चहापान रद्द होण्याचे कारण दिले गेले आहे.
Join Our WhatsApp Community