Monsoon Session : अजितदादांनी दम दिला आणि विरोधी पक्षनेते मुद्द्यावर आले…

178
Monsoon Session : अजितदादांनी दम दिला आणि विरोधी पक्षनेते मुद्द्यावर आले...

मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू करण्याऐवजी विरोधकांनी, सभागृहात मंत्री उपस्थित नाहीत असे कारण देत जवळपास अर्धा तास गदारोळ करीत सभागृहाचा वेळ वाया घालवला. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “विरोधकांच्या प्रशांना उत्तरे देण्याची जबाबदारी घेतो, पण चर्चा करायची नसेल तर अर्थसंकल्पावर मतदान होऊ द्या,” असा दम भरला आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी “दादांनी शब्द दिला म्हणून चर्चेला सुरुवात करतो,” असे सांगत गदारोळाला पूर्णविराम दिला. (Monsoon Session)

स्वतःचेच महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न

प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभा तालिका अध्यक्षस्थानी समाधान आवताडे बसले असताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी सभागृहात मंत्री नाहीत, असे सांगत विरोधी पक्ष नेत्याला काही किंमत आहे की नाही? अशी सांगून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सभागृहात गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे दोन मंत्री उपस्थित होते. त्यांनी मुद्दे नोंद होणार असल्याचे आश्वासन दिले. (Monsoon Session)

(हेही वाचा – Worli Hit And Run प्रकरणी अखेर मिहीर शाहला अटक; 12 जणही पोलिसांच्या ताब्यात)

भाषण कोण ऐकत आहे, याकडे लक्ष नको

या आश्वासनाने वडेट्टीवार यांचे समाधान झाले नाही. विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा आमदार भास्कर जाधव यांनी मग सभागृहातील अधिकाऱ्यांच्या कक्षात वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असून कुणीही सभागृहात का नाही? असा सवाल केला आणि सभागृहाचे कामकाज मंत्री येईपर्यंत काही काळ तहकूब करण्याची मागणी केली. ती सत्ताधाऱ्यांनी मान्य केली नाही. “तुमचे भाषण कोण ऐकत आहे, याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चर्चा करा,” अशी विनंती केली. (Monsoon Session)

नवा मुद्दा मांडत पुन्हा गदारोळ

त्यानंतर आमदार जयंत पाटील, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर आमदार उभे रहात गोंधळ सुरू केला. तेवढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात आले आणि त्यांनीही विरोधी पक्षाला चर्चा सुरू करण्याची विनंती केली. त्यावेळी सभागृहात सहा मंत्री उपस्थित झाले. तरीही वडेट्टीवार यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी आरोग्य मंत्री, महिला बालविकास मंत्री सभागृहात का नाहीत, असा नवा मुद्दा मांडत पुन्हा गदारोळ सुरू केला. अजित पवार यांनी विरोधकांना त्यांच्या मुद्द्यांना सरकारकडून दखल घेत उत्तरे दिली जातील, असे पुन्हा आश्वासन देत दोन ते तीन वेळा चर्चेला सुरुवात करण्याची विनंती केली. (Monsoon Session)

अर्थसंकल्प मतासाठी टाकायचा का?

अखेर “चर्चा करायची नसल्यास अर्थसंकल्प मतासाठी टाकायचा का?’ असा दम भरताच सगळे विरोधी आमदार जागेवर बसत चर्चेला सुरुवात झाली. अर्थसंकल्प विनाचर्चा मंजूर झाल्यास विरोधकांनी अर्थसंकल्पावर काही मत व्यक्त केले नाही, अशी नोंद इतिहासात होईल, ते होऊ नये म्हणून वडेट्टीवार यांनी अर्धा तास वेळ वाया घालवत अखेर चर्चा सुरू केली. (Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.