वंदना बर्वे
संसदेच्या नवीन इमारतीमधील प्रथम अधिवेशन जुलै महिन्यात होणार आहे. देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी संसदेची नवीन इमारत सज्ज आहे. यामुळे यावेळच्या पावसाळी अधीवेशनाची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापासून संसदेच्या या इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणारे २० हून अधिक पक्ष प्रथमच येथे पाऊल ठेवणार आहेत, हे विशेष.
(हेही वाचा – मणिपूर हिंसाचार : पोलिसांनी २४ तासांत १२ बंकर पाडले; शहा – मोदींमध्ये बैठक होण्याची शक्यता)
अधिवेशनाच्या तारखांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र हे अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. कर्नाटक विधानसभेत जोरदार कामगिरी आणि पाटणा येथे २३ जूनच्या बैठकीनंतर विरोधक एकजुटीमुळे उत्साहात आहेत. पण दिल्लीतील अध्यादेशावरून आम आदमी पक्षाची झालेली जमवाजमव आणि काँग्रेसची या मुद्द्यावरची संदिग्ध भूमिका पाहता विरोधी एकजुटीचीही कसोटी लागणार आहे. मणिपूर हिंसाचारावर विरोधकही हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
मोदी सरकारला २०२४ च्या निवडणुकांपूर्वी काही महत्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची हेत. डिजिटल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट, डिजिटल इंडिया अॅक्ट, जन्म-मृत्यू नोंदणी दुरुस्ती व दिल्ली अध्यादेशाच्या जागी विधेयक मंजूर करणे त्यापैकी प्रमुख आहेत. अशातच २०२४ च्या निवडणुकांपूर्वी केवळ पावसाळी आणि हिवाळी अधिवेशने उरली आहेत. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community