Monsoon Session : प्रविण दरेकरांचा विरोधकांना टोला; म्हणाले…

124
Monsoon Session : प्रविण दरेकरांचा विरोधकांना टोला; म्हणाले...

विधानपरिषदेत बोलताना शुक्रवारी (१२ जुलै) विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ‘सांगून गेली ज्ञानेश्वरी माणसापरं मेंढरं बरी’, असे वक्तव्य केले होते. त्याला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांना टोला लगावला. सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना दरेकर यांनी विरोधी पक्षनेते म्हणाले ‘सांगून गेली ज्ञानेश्वरी माणसापरं मेंढरं बरी’. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ आहेत. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरीचाही सन्मान केलाय. वारकऱ्यांसाठी २० हजार रुपये प्रत्येक दिंडीला देऊन तीर्थस्थळाचाही विकास करण्याचे काम ज्ञानेश्वर सांगून गेले त्याला आदर्श मानून केलाय. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेय. सर्व सामान्यांसोबत मेंढरांची आणि मेंढपाळांचीही काळजी घेतलीय, असा मिश्किल टोला दरेकरांनी विरोधकांना लगावला. (Monsoon Session)

कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री सर्वसामान्यांसाठी काम करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था हाताळताना पोलीस प्रशासनालाही अत्यंत कठोर भूमिका घेण्यासाठी भूमिका बजावल्या आहेत. परंतु मुंबईचा आनंद भोईटे नावाचा एक डीसीपी आहे झोन क्र. ११ चा. प्रतिभा घाडगे आणि हरिश्चंद्र घाडगे हे वारकरी जोडपे आहे. कांदिवलीत त्यांच्या मालकीचे ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहे. त्या कार्यालयाचा गाळा कुणाला तरी हवा आहे म्हणून भुमाफियांना हाताशी धरून त्याचे पाणी, वीज कापले व त्यांना बाहेर काढले. याला तेथील स्थानिक डीसीपीचा आशीर्वाद होता असा आरोपही दरेकरयांनी केला. तसेच यावेळी दरेकर यांनी घाडगे दाम्पत्याची मुख्यमंत्री ते डीसीपी यांना दिलेली तक्रारही सभागृहात वाचून दाखवली. (Monsoon Session)

दरेकर पुढे म्हणाले की, गृहमंत्र्यांना याबाबत सांगितले, पत्रही दिले. तेथील नगरसेविका संध्या विपुल दोषी आणि त्यांचे पती दादागिरी करताहेत. तेथील डीसीपी सहकार्य करत नाही. ते स्वतः त्यांच्याशी बोलले तरीही घाडगे दाम्पत्यावर अन्याय सूरु आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा अधिकारी कर्तव्यावर राहता कामा नये. त्याचे तात्काळ निलंबन करावे आणि संध्या विपुल दोषी व त्यांचे पती हे विकासकाचे भागीदार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही दरेकरांनी केली. (Monsoon Session)

दरेकर पुढे म्हणाले की, वांद्रे ते मरिन ड्राइव्ह कोस्टल रोडवरून १२ मिनिटांत पोहोचणार आहोत. हा रोड बघण्यापुरता नाही तर वेळेची ७० टक्के आणि इंधनाची ३४ टक्के बचत होणार आहे. येथील खलाशी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्त यांनाही विकास होताना न्याय देण्याचा प्रयत्न झालाय. मुंबईत नेहमी वेगवेगळ्या प्रकारची संकटे येतात. कधी अपघातात मुंबईकर मरण पावतो, तर कधी जाहिरातीचे फलक कोसळून. कधी पेटत्या रुग्णालयात किंवा दहशतवाद्यांच्या गोळीबारात सापडेल याची शाश्वती नाही. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर याला आम्ही ‘स्पिरिट’ बोलतो. हे शहर आता आकार घेतेय. नालेसफाईबाबत चांगले काम उभे राहतेय. रस्त्याची कामे मोठ्या गतीने होताहेत. परंतु सातत्याने त्यांच्या कंत्राटा, निविदेविषयी आक्षेप घेतले जातात. जर करोडो रुपये नालेसफाई, रस्त्याच्या कामावर खर्च करणार असू तर त्याचा लेखाजोखा मुंबईकरांसमोर आला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले. (Monsoon Session)

(हेही वाचा – राज्यातील लहान मुले अन् विद्यार्थ्यांना घातक एनर्जी ड्रिंक्सचा विळखा – MLC Satyajeet Tambe यांनी सभागृहात उपस्थित केला मुद्दा)

पर्यटनावर भर देण्याची गरज

दरेकर म्हणाले की, मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील अशा प्रकारच्या मोठ्या गोष्टी करण्याची अत्यंत गरज आहे. नॅशनल पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित करण्याचे काम व्हावे. मुंबईला मोठ्या चौपाट्या आहेत. त्या आंतरराष्ट्रीय धर्तीवर सुशोभीत केल्या पाहिजेत. जगातून, देशातून येणारा पर्यटक चौपाट्यांवर विसावला पाहिजे. त्याचाही कृती आराखडा सरकार आणि महापालिकेने एकत्रित करण्याची गरज आहे. (Monsoon Session)

तसेच कोळीवाडे आहेत. कोळी परंपरा, संस्कृती मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहे. छोट्या रेस्टोरंटला मोठा प्रतिसाद आहे. मुंबई, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे याची नियोजन पद्धतीने दालने उभी केली तर बाहेरील पर्यटकांना मुंबईत फिरता व पैसे खर्च करता येतील. त्यानिमित्ताने आर्थिक हातभार मुंबई शहराला लागेल, असेही दरेकरांनी यावेळी शासनाला सुचविले. (Monsoon Session)

प्रविण दरेकरांनी केलेल्या मागण्या

१) मुंबईतील सहकार खात्याची वॉर्ड ऑफिसेस नवी मुंबई कोकण भवन आणि फोर्टला आहेत. ती पालिकेच्या वॉर्डमध्ये देण्याचे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेत. परंतु पालिकेचे प्राधान्य दिसत नाही. तात्काळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा आदेश अंमलात आणावा व कार्यालये उपलब्ध करून द्यावीत.

२) मुंबई ज्या झोपडपट्ट्या आहेत तेथे सौरऊर्जा पॅनल बसवावा. जेणेकरून वन जमिनीवर वीज देतानाही त्याचा उपयोग होईल.

३) आपण महाराष्ट्र भवन काश्मीर, अयोध्येला बांधतोय. परंतु ग्रामीण भागातील मुले मुंबईत येतात त्यांच्यासाठी काहीच सुविधा नाही. एखादे महाराष्ट्र भवन वसतिगृह केले तर शेतकऱ्याची, ग्रामीण भागातील मुले शिक्षण व रोजगार घेऊ शकतील.

४) मुंबईत मोठ्या प्रमाणावर घर बांधणी होते. ती घरे बांधत असताना टॉवरच्या टॉवर उभे राहताहेत. तेथे सर्व सोई सुविधांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

५) मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना आणली. त्या योजनेला राज्य सरकारने राजाश्रय दिलाय. मुंबई बँक गृहनिर्माण संस्थेला पैसे उपलब्ध करून देते व स्वतःचा पुनर्विकास स्वतः करा, इमारत बांधा. बिल्डर ४०० ते ४५० स्क्वे. फुटाचे घर देत असेल तर ८०० ते ८५० स्क्वे. फुटाचे घर त्यात मिळते. यात शासनाने ४ टक्के व्याजदर गृहनिर्माण सोसायट्यांना द्यावा.

६) मुंबईचा विकास होत असताना येथील माणूस बेरोजगार होता कामा नये. मुंबई बदलली पाहिजे परंतु मुंबईच्या सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळाले पाहिजे. तो मुंबईतून परागंदा होता कामा नये. याची विकासासोबत शासनाने काळजी घ्यावी

७) जिथे जिथे पाण्याची कमतरता होतेय तिथे महापालिकेने सांगड घालण्याची गरज आहे. महिलांची ससेहोलपट थांबली पाहिजे. कांदिवलीतील समता नगरला तात्काळ पाणीपुरवठा करावा.

८) बोरिवली ते ठाणे भुयारी मार्ग होतोय. तेथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे. वन जमिनीवरील पुनर्विकास, तेथील आदिवासी लोकांना नागरी सुविधा देण्याबाबत सरकारने लक्ष घालावे.

९) मनपाने सर्वसामान्यांसाठी काम करावे, ठेकेदारांसाठी नाही. टॉवरवाल्यांच्या मागे फिरण्यापेक्षा सामान्य माणसाला आयुक्तांनी प्राधान्य द्यावे.

१०) मुंबईतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न रखडला आहे. त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सरकारने प्राधान्याने हाती घेऊन मार्गी लावावा. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्नही रेंगाळला आहे. तोही मार्गी लावावा. (Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.