Monsoon Session : राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर बोचरी टीका; म्हणाले…

175
Monsoon Session : राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर बोचरी टीका; म्हणाले...

मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजानेच ओळखावे. कारण तब्बल चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही ज्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही. केवळ मताचे राजकारण करत समाजा समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची अशी बोचरी टीका राज्याचे महसूल व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (१० जुलै) शरद पवारांचे नाव न घेता विधानसभेत केली. समाजातील लोकांना झुलवत ठेवण्याचे मोठे षडयंत्र आखले जात असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. (Monsoon Session)

मराठा आरक्षणावर महायुतीने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीने न जाण्याचा निर्णय घेतला. त्यावरून बुधवारी विधानसभेत मोठा गदारोळ झाला. महायुतीच्या सर्व नेत्यांनी विरोधी पक्षाला धारेवर धरत बैठकीला येण्यापासून तुम्हाला कोणी रोखले, कोणाचे मेसेज आले याचा खुलासा करण्याची जोरदार मागणी केली. त्यावेळी याच मुद्द्यावरून मंत्री विखे पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच खरपूस समाचारही घेतला. (Monsoon Session)

(हेही वाचा – ICC Player of the Month : जसप्रीत बुमरा, स्मृती मंधाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू)

उद्धव ठाकरेंवही साधला निशाणा 

मंत्री विखे पाटील यांनी नाव न घेता शरद पवारांवर स्पष्ट आणि थेट आरोप केले की, चार वेळा मुख्यमंत्री राहूनही त्यांनी आजतागायत मराठा आरक्षणाच्या बाजूने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही, ना कधी मराठा आरक्षणाच्या बाजूने ब्र शब्दही काढला नाही, ते कोणत्याही मोर्चात दिसलेही नाहीत. त्यांनी कधीही आरक्षणाच्या बाबतीतील आपली भूमिका समाजाच्या समोर मांडली नाही, अशा परखड शब्दात त्यांनी पवारांवर निशाणाही साधला. (Monsoon Session)

त्यावेळी मंत्री विखे यांनी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री केवळ फेसबुकवर होते.तर त्यांचे नेते रिमोट कंट्रोल वर काम करत राहिले. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण गमवावे लागले असल्याचा थेट आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही थेट निशाणा साधला. (Monsoon Session)

(हेही वाचा – Drunk and Drive : दारू पिऊन गाडी चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार ?; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय)

मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण? 

आजही अशाच भूमिकेतून समाजाची दिशाभूल करण्याचे काम विरोधक आणि महाविकास आघाडीचे नेते करत असल्याची टीका करून विखे पाटील यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले की, त्यांनी मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता तरी ओळखावे आणि अशा नेत्यांना गावबंदी करावी. (Monsoon Session)

महायुती सरकार हे मराठ्यांच्या बाजूने असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे.यासाठी सरकारने एक पाऊल पुढे येऊन मंगळवारी सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती.मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सिद्ध करून दाखवले असल्याने त्यांच्या या बेगडी मराठा प्रेमाचा आम्ही निषेध करत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी नमूद केले. (Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.