Monsoon session: वारकऱ्यांना टोल माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

58
Monsoon session: वारकऱ्यांना टोल माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय!
Monsoon session: वारकऱ्यांना टोल माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session) आज (३ जुलै) सहावा दिवस आहे. मंगळवारी विधान परिषदेत विरोधी पक्षनेत अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. स्मार्ट मीटर कश्यासाठी, अदानीच्या फायद्यासाठी असे म्हणत महविकास आघाडीने आज राज्यातील भ्रष्टाचार प्रकरण विरोधात पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी चंदा दो धंदा लो अश्या घोषणा देत सरकार विरोधात आंदोलन केले.

मुंबईत पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर

मुंबईत पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. उबाठाने पाणी देऊ अशी घोषणा केली होती. सात धरणातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. यात 7 टक्के पाणीसाठा वाढला आहे. पण आगमी काळात पाणी पुरवठा कसा करणार, यावर सरकारने उत्तर दिले पाहिजे. असं आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले. (Monsoon session)

वारकऱ्यांना टोल माफ

पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना सरकारकडून टोल माफी करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला असून राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी मोफत करण्यात आले आहेत. पंढपूरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ केले आहेत. (Monsoon session)

17 जुलै रोजी पंढपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरकडे जात असतात. या सर्व वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत ही टोलमाफी असणार आहे. अक्षय महाराज भोसले (Akshay Maharaj Bhosale) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Monsoon session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.