Kerala : केरळमधील मोपला बंड ते Hamas

151

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, धर्मरक्षणासाठी शस्त्र हवं, पण शस्त्रावर अंकुश हवा तो धर्माचा. पण मुसलमानांचा धर्मच ‘काफिरांना’ मारा असं सांगतो, हिंसेला प्रोत्साहन देतो, तर मग त्यांच्यावर अंकुश ठेवणार तरी कोण? नुकतेच ‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे हिंदू मुलींचे कशा प्रकारे मुसलमानांनी त्यांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर केले आणि त्यांना आयसिस या दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना उपभोगण्यासाठी सीरियाला पाठवण्यात आल्याचे वास्तव मांडण्यात आले. खरंतर मुसलमानांनी हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतरण करणे, स्त्रियांना पळवणे, विकणे, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणे, बलात्कार करणे हे हिंदूंसाठी काही नवीन नाही. दुर्दैवाने तो हजारो वर्षांचा क्रूर इतिहास आहे. पण जाणूनबुजून इतिहासाची तोडमोड केलेल्या आपल्या देशात खरा इतिहास जनतेसमोर कधी आलाच नाही, स्वार्थासाठी तो समोर येऊ दिला गेला नाही. छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग आणि त्यांची मुले, बंदा बैरागी आणि त्यांचे शिष्य असे लक्षावधी हिंदू मुसलमानांच्या धर्मवेडाला बळी पडलेच आणि स्त्री तर काय? या अत्याचाऱ्यांसाठीची एक कायमची, हक्काची, उपभोग्य वस्तूच होती आणि आजही आहे. केरळमधल्या ज्या घटनेने आज थोडाफार हिंदू समाज खडबडून जागा होऊ लागला आहे, त्याच केरळ (Kerala) च्या मलबार भागात १०२ वर्षांपूर्वी हिंदूंचा नरसंहार झाला होता, जो आज विस्मृतीत गेला आहे.

हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार

मोपल्यांचे अत्याचार सोसलेल्या केरळा (Kerala) तील मलबारमधील महिलांनी व्हॉईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या पत्नी लेडी रीडिंग यांना आपली दुःखद कहाणी सांगितली. त्यांनी म्हटले की, ‘…आमच्या धर्म सोडण्यास नकार दिलेल्या आमच्या प्रिय व्यक्तींच्या सडलेल्या प्रेतांनी आणि मरणासन्न अवस्थेत फेकलेल्या असंख्य देहांनी विहिरी आणि तलाव आज भरलेले आहेत. गर्भवती स्त्रियांच्या पोटातून त्यांचे गर्भ बाहेर काढण्यात आले; त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून रस्त्यावर, जंगलात फेकण्यात आले; आमच्या मुलाबाळांना आमच्या हातातून खेचून आमच्या डोळ्यांसमोर मारले गेले आणि आमचा पती, पित्याला छळ करून जिवंत जाळले गेले; आमच्या अभागी भगिनींना त्यांच्या आप्तस्वकीयांमधून खेचून काढत त्यांच्यावर त्या नरराक्षसांनी कल्पनाही करता येणार नाही, असे पाशवी अत्याचार केले. विध्वंसाच्या पाशवी आकांक्षेने आमच्या घरादारांची राखरांगोळी केली; आमची मंदिरे अपवित्र करून उद्ध्वस्त केली, मूर्ती फोडण्यात आल्या. विद्रूप केलेल्या देवतांच्या मूर्तीवरील पुष्पहार काढून त्यांच्या गळ्यात गायींची आतडी घालण्यात आली…आमच्या गावातून आम्हाला नग्नावस्थेत बाहेर काढण्यात आल्यावर आम्ही उपाशीपोटी जंगलात कसे दिवस काढत होतो, हे आम्ही विसरू शकत नाही.’

(हेही वाचा : Uttarakhand : ३० मदरशांमध्ये ७४९ गैर मुस्लिम विद्यार्थी शिकताहेत Islam)

मुसलमानांकडून झालेले अत्याचार विसरण्याची हिंदूंची वृत्ती

मोपला हत्याकांड ही हिंदूंवरील नृशंस, राक्षसी अत्याचारांची परिसीमा होती. हा दुर्दैवी इतिहास विसरून चालणार नाही. त्याचा तसाच प्रतिशोध घेणे योग्य नाही आणि हिंदूंच्या ते रक्तातही नाही; पण हे परत परत घडू नये, यासाठी निद्रिस्त हिंदूंनी जागे होण्याची गरज आहे. या राक्षसी नरसंहारावर सावरकरांनी कादंबरी लिहिली ‘मोपल्याचे बंड अर्थात मला काय त्याचे’ या पुस्तकातील अत्याचारांची वर्णन वाचून अंगावर शहारे येतात, ते वाचून मन सुन्न होते, प्रेतांनी भरलेल्या विहिरी विचारही नकोसा वाटतो. मग ज्यांनी ते प्रत्यक्ष भोगले, सोसले, ते घडताना जबरदस्तीने ज्यांना सारे पहावे लागले, अर्धमेल्या अवस्थेत ज्यांना प्रेतांनी भरलेल्या विहिरीत फेकण्यात आले, त्यांची काय अवस्था झाली असेल. हे सारे विसरून जायचे? शेजारचे घर जळत असताना ‘मला काय त्याचं’ ही वृत्ती ठेवायची. सावरकरांनी हिंदूंच्या याच वृत्तीवर प्रहार केला. आजही आपण झोपलेलेच आहोत, त्यामुळे आजूबाजूला काय घडते याची जाण आणि भान आपल्याला नाही. भीषण मोपला हत्याकांड घडल्यानंतर ‘शूर मोपला बंधू त्यांच्या धर्मानुसार वागले’ असे म्हणणारा महात्मा आजही जीवित आहे का? आजचे अनेक महात्मे दुर्दैवाने आपलेच आहेत आणि हीच आपली खरी समस्या आहे. संकट आता प्रत्येकाच्या घराशी येऊन ठेपले आहे. हिंदुस्थानला दारूल इस्लाम करण्याच्या दृष्टीने शत्रूची पावले वेगाने पडू लागली आहेत. २० ऑगस्ट १९२१ ते १९२२ पर्यंत केरळ (Kerala) च्या मलबार भागात मोपला बंडाच्या नावाखाली हिंदूंचा नरसंहार करण्यात आला होता.

केरळमध्ये मोपला बंडाची पुनरावृत्ती?

आजही याच केरळमध्ये मुसलमान धर्मांधतेचा नंगानाच करत आहेत. आज मध्य-पूर्व भागात इस्रायलवर पॅलेस्टिनमधील हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेने हल्ले केले, ज्यूंच्या लहान मुलांचा शिरच्छेद केला, महिलांवर बलात्कार करून त्यांच्या देहाची विटंबना केली, त्यांचे व्हिडिओ काढून व्हायरल केले. या हमास (Hamas) च्या समर्थनार्थ याच केरळमध्ये रॅली काढण्यात आली. गेल्या आठवड्यात जमात-ए-इस्लामीने केरळमधील मलप्पूरममध्ये हमासचे उघडपणे समर्थन केले. त्या रॅलीला हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेच्या माजी प्रमुखाने ऑनलाइन माध्यामातून संबोधित केले होते. ‘त्याला बोलण्याची परवानगी कशी देण्यात आली?’, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी उघडपणे सांगितले की, ‘हमास ही भारताने बंदी घातलेली संघटना नाही.’ हे कोणते लाॅजिक आहे? एखादा मुख्यमंत्री असे सांगेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का? सामान्यतः जागतिक संघटनांवर कोणताही देश बंदी घालत नाही. हमासचा भारताशी थेट संबंध नाही. त्यामुळे भारताने हमास (Hamas) वर कायदेशीर बंदी घालण्याची गरज नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, इस्रायलमध्ये अमानुष अत्याचार करणाऱ्या हमासच्या नेत्याला यात सहभागी होण्यास परवानगी देण्यासाठी आपण कोणतीही कारवाई करू शकत नाही. एका अत्यंत स्थानिक स्तरावरील रॅलीमध्ये हमासच्या नेत्याला हे बोलवू शकतात, याचा अर्थ जमात-ए-इस्लामीच्या लोकांचे हमासच्या नेतृत्वाशी संबंध आहेत. त्यामुळेच त्यांच्या माजी प्रमुखाला रॅलीमध्ये सहभागी करून घेऊ शकले. ते या दहशतवादी संघटनेच्या सतत संपर्कात आहेत, हेच यातून दिसून येते. हीच मोपला बंडाची पुनरावृत्तीची सुरुवात असू शकते, यावेळीही हिंदू समाजाने ‘…मला काय त्याचे’ हीच वृत्ती ठेवली, तर हिंदूंचा नरसंहार पुन्हा होणे निश्चित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.