नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या अंध व्यक्तींच्या शिक्षण, पुनर्वसन आणि रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा ७४ वा स्थापना दिवस संस्थेच्या वरळी, मुंबई येथील सभागृहात सोमवारी (दि. २०) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
राज्यपालांनी या प्रसंगी उपस्थितांना नेत्रदानाचा महत्त्व पटवून दिला. “नेत्रदानातून अनेक दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी नेत्रदानाचा संकल्प केला असून, अधिकाधिक लोकांनीही हा संकल्प करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
(हेही वाचा – ठाण्यात फेरीवाल्यांमध्ये Bangladeshi infiltrators चा सुळसुळाट; धक्कादायक अनुभव वाचाच…)
नेत्रदानासाठी प्रेरणादायी उपक्रम
राज्यपालांनी झारखंड (Jharkhand) येथील त्यांच्या कारकिर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७३ लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेतल्याची आठवण सांगितली. तसेच महाराष्ट्रात २०२४ मध्ये पंतप्रधानांच्या वाढदिवशी ७४० लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. “यंदा पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेण्याचे लक्ष्य आहे,” असेही राज्यपालांनी जाहीर केले. (C. P. Radhakrishnan)
नॅबचे योगदान आणि महत्त्व
राज्यपालांनी नॅब संस्थेच्या योगदानाची प्रशंसा केली. संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचा उल्लेख करत, “नॅब ही संस्था दृष्टिहीन आणि दृष्टिबाधित व्यक्तींना सक्षमीकरणाची हमी देते,” असे ते म्हणाले. ब्रेल प्रिंटिंग प्रेस, टॉकिंग बुक्स, परफ्युमरी प्रशिक्षण, आणि शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे नॅब दृष्टीहीन व्यक्तींना आत्मनिर्भर जीवनासाठी सक्षम बनवत आहे, असे त्यांनी नमूद केले.
(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway वर तीन दिवसांचा Traffic block; कोणत्या मार्गांवर असणार वाहतूक सुरु? वाचा…)
राजभवनाची पाठराखण
राज्यपालांनी आपल्या पूर्ववर्ती रमेश बैस (Ramesh Bais) यांनी ब्रेल प्रिंटिंग प्रेस खरेदीसाठी केलेल्या अर्थसहाय्याचा उल्लेख केला. “नॅबच्या कार्यासाठी राजभवन भविष्यातही खंबीरपणे पाठीशी उभे राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुरस्कार वितरण आणि उपस्थित मान्यवर
कार्यक्रमादरम्यान राज्यपालांच्या हस्ते विविध पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव हरिंदर कुमार मल्लिक, कार्यकारी महासचिव डॉ. विमल देंगडा, कार्यकारी संचालक पल्लवी कदम तसेच संस्थेचे आश्रयदाते व विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपालांनी नॅब संस्थेला आगामी काळातही आपल्या उपक्रमांद्वारे समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community