धक्कादायकः महाराष्ट्र शासनात 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त

एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या 10 लाख 99 हजार 104 इतकी आहे. ज्यापैकी 8 लाख 98 हजार 911 पदे भरलेली आहेत.

196

महाराष्ट्र शासनाचे शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत आजमितीस 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महाराष्ट्र शासनाने दिली आहे. एकूण 29 विभागांपैकी या रिक्त पदांत 16 असे विभाग आहेत ज्याची माहिती अद्ययावत नाही.

राज्य शासनाची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गांतील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट-अ, ब, क आणि ड मधील 31 डिसेंबर 2019 पर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली.

(हेही वाचाः मुख्यमंत्री-पवार यांच्यात पुन्हा एकदा भेट! कोणत्या विषयांवर झाली चर्चा?)

इतकी पदे रिक्त

एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या 10 लाख 99 हजार 104 इतकी आहे. ज्यापैकी 8 लाख 98 हजार 911 पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची 1 लाख 53 हजार 231, तर जिल्हा परिषदेच्या 40 हजार 944 अशी पदे रिक्त आहेत. एकूण 29 विभागांपैकी 16 विभागांची 31 डिसेंबर 2018 पर्यंतची माहिती उपलब्ध आहे.

या खात्यांमध्ये आहेत पदे

या विभागांत गृह विभागाची चार खाती, महसूल व वन विभागाची तीन खाती, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, सामाजिक व न्याय विभाग, नगरविकास विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, ग्रामविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मृद व जलसंधारण विभाग, गृहनिर्माण विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आहेत.

(हेही वाचाः स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सेनेकडून १० लाखाची मदत)

रिक्त पदांमुळे जनतेला त्रास

मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शासनाने रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.