-
प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्यावर संपूर्ण विधान परिषद विश्वास व्यक्त करीत असल्याचा विश्वासदर्शक प्रस्ताव बुधवारी सभागृहात मंजूर करण्यात आला. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी हा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला होता.
(हेही वाचा – अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार; मंत्री Uday Samant यांची माहिती)
“महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे”, असा एक ओळीचा प्रस्ताव आ. दरेकर यांनी सभागृहात मांडला. यानंतर विधान परिषदेचे सभापती यांनी हा प्रस्ताव मतासाठी ठेवला. आवाजी मतदानाने सभागृहाने हा प्रस्ताव मंजूर केला.
(हेही वाचा – Pakistan Cricketer Death : अतीउष्म्यामुळे मैदानातच कोसळला; ४१ वर्षीय पाक क्रिकेटपटूचा मृत्यू)
यानंतर सभापतींनी “प्रस्ताव मंजूर झालेला आहे” अशी अधिकृत घोषणा केली. यासोबतच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्यावर विधान परिषदेचा पूर्ण विश्वास असल्याची अधिकृत नोंद झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community