विधानपरिषद निवडणुकीसाठी BJP मध्ये हालचालींना वेग; मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी?

62
विधानपरिषद निवडणुकीसाठी BJP मध्ये हालचालींना वेग; मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी?
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत राज्यात पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुका होत असल्याने भाजपासह (BJP) सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषदेतील पाच रिक्त जागांसाठी २७ मार्चला मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी रस्सीखेच सुरू आहे.

महायुतीत तणाव, भाजपाच्या तीन जागांसाठी चुरस

या पाच जागांपैकी तीन जागा भाजपाला (BJP), एक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला आणि एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार आहे. मात्र, या जागांसाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. भाजपाच्या ताब्यातील जागांसाठी अनेक दिग्गज इच्छुक असून, विशेषतः मराठवाड्यातील एका जागेसाठी दोन प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

(हेही वाचा – Ayushman Yojana : आयुष्मान योजनेत वयोमर्यादा 60 पर्यंत वाढवणार, मदतही मिळणार दुप्पट)

विधानपरिषदेत कोण कोणाची जागा घेणार?

या निवडणुकीत भाजपाचे (BJP) प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, आणि शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्या जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे नवीन उमेदवारांच्या निवडीसाठी भाजपामध्ये (BJP) मोठ्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेसाठी तब्बल १०० जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे, आणि लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

भाजपाच्या उमेदवारांसाठी दिल्लीदरबारी चर्चा सुरू

भाजपाच्या (BJP) वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. विदर्भातील प्रवीण दटके विधानसभेत गेल्याने त्यांच्या जागी विदर्भातून कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, भाजपाच्या (BJP) उच्चस्तरीय बैठकीत माधव भंडारी, दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांची नावे निश्चित झाली असल्याचे सूत्रांकडून कळते.

(हेही वाचा – राजकीय, सरकारी जाहिरातींत महिलेच्या छायाचित्रांचा वापर ; High Court मध्ये याचिका दाखल)

मराठवाड्यातील जागेसाठी ‘या’ दोन नावांमध्ये चुरस

भाजपाच्या (BJP) मराठवाड्यातील जागेसाठी लातूर अथवा धाराशिव जिल्ह्यातील एका उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील भाजपा नेते रमेश कराड यांच्या जागेसाठी लातूरच्या अर्चना पाटील-चाकुरकर आणि धाराशिवच्या बसवराज पाटील-मुरूमकर यांच्यात तीव्र स्पर्धा आहे.

१) अर्चना पाटील-चाकुरकर

अर्चना पाटील यांनी लातूर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना किंचित फरकाने पराभव स्विकारावा लागला. विधानसभेसाठी त्यांना पक्षाने संधी दिली होती, त्यामुळे विधानपरिषदेसाठीही त्यांचे नाव दिल्लीपर्यंत चर्चेत आहे.

२) बसवराज पाटील-मुरूमकर

बसवराज पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील माजी आमदार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला होता, मात्र विधानपरिषदेच्या संधीच्या अटीवर ते काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – UP : देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला देणाऱ्या शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याला अटक)

महत्त्वाचा निर्णय लवकरच

मराठवाड्यातील या दोन दिग्गज नेत्यांमध्ये कोणाला विधानपरिषदेसाठी संधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या (BJP) दिल्लीतील हायकमांडकडून अंतिम निर्णय घेतला जाणार असून, लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.