छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि राजस्थान (Rajasthan) या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, परंतु तिन्ही राज्यांमधील भाजपच्या (BJP) विजयाने विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपच्या विजयाची कोणती कारणे अस शकतात, ते जाणून घेऊया.
1. ‘लाडली बहना’ योजना
‘लाडली बहना’ (ladli behna yojana) योजनेअंतर्गत थेट रोख रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरण करण्यात आली. या योजनेंतर्गत शिवराज (Shivraj Singh Chouhan) सरकारने राज्यातील एक कोटी 31 लाख महिलांना दरमहा 1250 रुपये दिले आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. ती वाढवून 3 लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांनी शिवराज सरकारच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान केले, असे गृहित धरले जाऊ शकते.
(हेही वाचा – Cyclone Michaung : तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा)
2. लोकप्रिय योजना
तीर्थदर्शन, लाडली लक्ष्मी, कन्यादान योजना, आयुष्मान योजना आणि बहुतेक योजनांमध्ये जनतेच्या थेट बँक हस्तांतरणाचा परिणाम मतदानावर झालेला असू शकतो.
3. हिंदुत्वाचा पुरस्कार
हिंदु धार्मिक स्थळांना आध्यात्मिकता, तसेच आधुनिकतेचा स्पर्श देण्यावर भाजप सरकारांचा भर होता. उज्जैन कॉरिडॉर (Ujjain’s Mahakal Corridor) याचे एक उदाहरण आहे. याशिवाय, सलकनपुरमधील देवी लोक, ओरछामधील राम लोक, सागरमधील रविदास स्मारक आणि चित्रकूटमधील दिव्य वनवासी लोक या राज्यांतील चार मंदिरांचा विस्तार आणि स्थापनेसाठी शिवराज यांनी 358 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या सर्व योजनांमुळे हिंदुत्वाच्या बाजूने वातावरण निर्माण झाले, ज्याचा थेट फायदा भाजपला झालेला असू शकतो.
(हेही वाचा – Longest Line of Bicycles Statics : इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली!)
4. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा फायदा
मध्य प्रदेश हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) बालेकिल्ला राहिला आहे. हे राज्य बऱ्याच काळापासून हिंदुत्वाची प्रयोगशाळा देखील राहिले आहे. राज्यभरात आर.एस.एस.ची भक्कम उपस्थिती आहे. लोकांवर प्रभाव टाकण्यात आणि मतदारांना त्यांच्या बाजूने मतदान केंद्रावर आणण्यात हे कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. भाजप (BJP) काँग्रेसपेक्षा (Congress) मागे पडण्याच्या अंदाजानंतर हा संघ मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला. त्यांच्या सक्रियतेमुळे गावांमध्ये आणि शहरांमध्ये भाजपाचे पारंपरिक मतदार बाहेर आले.
5. आदिवासी वर्ग तारणहार
राज्यात 47 जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 31 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 16 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 2018 मध्ये राज्यात सरकार स्थापन केले होते. यातून धडा घेत शिवराज सरकारने या वर्गासाठी अनेक योजना सुरू केल्या होत्या. बिरसा मुंडा जयंती (Birsa Munda Jayanti), भोपाळच्या हबीबगंज स्थानकाला (Habibganj Railway Station) राणी कमलापतीचे नाव देणे, तात्या भील चौराहा, आदिवासी पंचायतींमध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी यासारख्या योजनांवर सातत्याने काम केले जात होते.
6. काँग्रेसचा अतिआत्मविश्वास नडला
कमलनाथ (Kamal Nath) आणि दिग्विजय सिंह (Digvijay Singh) या जोडीने सुरुवातीला काँग्रेसला मोठी आघाडी मिळवून दिली, परंतु उमेदवारांची घोषणा होताच लोकप्रियता कमी होऊ लागली. काँग्रेसने जुन्या चेहऱ्यांच्या आधारे शिवराज सरकारविरुद्ध जिंकण्याचा खेळ खेळायला सुरुवात केली. याशिवाय पक्षाने केलेल्या सर्वेक्षणांमध्येही काँग्रेसच्या प्रचंड विजयाबद्दल सातत्याने सांगितले जात होते. परिणामी प्रत्यक्षातील मतदारांशी संपर्क साधण्याऐवजी काँग्रेस अतिआत्मविश्वासी आणि वरवर अतिसक्रिय असल्याचे दिसून आले. भाजप प्रतिसादाच्या आधारे आपली कामगिरी सातत्याने सुधारत असल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांवर तिकीट वाटपात पक्षपात केल्याचा आरोप करण्यात आला. कमकुवत उमेदवारांमुळे काँग्रेसच्या बाजूने निर्माण झालेले वातावरण कमकुवत झाले. (MP Assembly Election 2023 )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community